तरुण भारत

कोरोनाची लस भारतात तयार होणार

मेपासून निर्मिती, सप्टेंबपर्यंत 4 कोटी लस : अदर पूनावाला यांची माहिती

@ पुणे / प्रतिनिधी

कोरोना लसीसंदर्भात पुण्यातील सिरम इन्स्टिटय़ूटने इंग्लंडमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीसोबत संशोधनात्मक काम सुरू केले असून, लवकरच ही लस भारतात तयार आहे. मेपर्यंत या लसीचे उत्पादन सुरू करणार असून, सप्टेंबरपर्यंत 4 कोटी लस तयार करणार असल्याची माहिती सिरम इन्स्टिटय़ूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी सोमवारी येथे दिली.

कोरोनाने अवघ्या जगाला विळखा घातला असून, या विषाणूने आत्तापर्यंत 2 लाखांहून अधिक जणांचा बळी घेतला आहे. भारतापुढेही कोरोनाने आव्हान उभे केले असून, ही आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर जगभर कोरोनावरील लसीचे संशोधन सुरू असून, विविध देशांमध्ये यासंदर्भातील कामाने वेग घेतला आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या हय़ुमन ट्रायलमध्ये पुण्यातील सिरम इन्स्टिटय़ूटदेखील सहभागी झाली आहे.

यासंदर्भात बोलताना पूनावाला म्हणाले, इंग्लंडमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीशी आमचा याबाबत करार झाला आहे. यूएस कंपनी, पुण्यातील तसेच अन्य वेगळय़ावेगळय़ा कंपन्या अशा चौघांचा यात समावेश आहे. मागे इबोलावरही अशीच लस तयार करण्यात आली होती. कोरोना लसीबाबत सध्या लंडनमध्ये माणसांवर याचे टेस्टिंग सुरू आहे. मात्र, त्याचे रिझल्ट येण्याकरिता सप्टेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे. परंतु, तोपर्यंत न थांबता रिस्क घेऊन आम्ही मे-जूनमध्येच लस तयार करणार आहोत. आत्ताच या स्तरावर काम केले नाही, तर आपल्याला सहा महिने थांबावे लागेल. म्हणूनच ही जोखीम स्वीकारणे महत्त्वपूर्ण ठरते. त्यासाठी ही लस बनवून ठेवण्यात येईल व लस यशस्वी झाल्याचा रिझल्ट आल्यानंतर ती बाजारात आणली जाईल.

कोरोना लसीकरिता 600 कोटी लस तयार करणाऱया प्लँटची आवश्यकता आहे. त्यामुळे आमचा सध्याच्या याच क्षमतेच्या प्लँटमधील विविध लसींचे उत्पादन बंद करून त्याचे रूपांतर सध्या कोविडकरिता करण्यात येणार आहे. यामुळे कंपनीला मोठे नुकसान होणार आहे. परंतु, दुसरा प्लँट उभा राहीपर्यंत हे करणे देशाची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

एक हजार रुपयांपर्यंत लस उपलब्ध होणार

सप्टेंबरपर्यंत साधारणपणे 4 कोटी लस तयार केल्या जातील, असे सांगून ते म्हणाल्या, यासाठी तसा मोठा खर्च आहे. त्यामुळे त्याची 9 ते 10 हजारांपर्यंतही विक्री करता येऊ शकते. मात्र, आपल्या वडिलांनी सामाजिक भान व सेवाभाव ठेऊन वैद्यकीय सेवा देण्याची सदैव शिकवण दिली आहे. त्यामुळे एक हजार रुपयांपर्यंत ही लस उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

बार्शीत शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी फोडले बजाज फायनान्स ऑफिस

triratna

भांडुपमधील रुग्णालयाच्या आगीची देवेंद्र फडणवीसांकडून पाहणी

triratna

अटी व शर्तींसह दुकाने उघडण्यासाठी नगरपालिकेची परवानगी

Shankar_P

मान्सूनचा परतीचा प्रवास सोमवारपासून

Patil_p

पुणे विभागात कोरोना रुग्णांची संख्या 1,23,967 वर

pradnya p

सोलापूर : कोरोना रुग्णांमध्ये घट, आज नवे दोनच रुग्ण

Shankar_P
error: Content is protected !!