तरुण भारत

गुजरातमध्ये काँग्रेस नेत्याचा कोरोनाने मृत्यु

15 एप्रिलला केले होते रुग्णालयात दाखल

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

अहमदाबाद महापालिकेतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नगरसेवक बद्रुद्दीन शेख यांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. 15 एप्रिल रोजी करण्यात आलेल्या तपासणीमध्ये त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांना तातडीने सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.

त्यांना मधुमेह आणि हृदयविकाराचाही त्रास होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये फारसा फरक पडला नाही. त्यांना 17 रोजी व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलेहोते. त्यातच त्यांचा कोरोना टेस्ट अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचीही तपासणी करण्यात आली. त्यांच्या पत्नीच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांनाही रुग्णालयात दाखल केले आहे. बद्रुद्दीन शेख यांच्या मृत्युची माहिती काँग्रेस नेते शक्तीसिंह गोहिल यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. गेल्या 40 वर्षांपासून ते काँग्रेसमध्ये कार्यरत होते. त्यांच्या मृत्युने आमचा मोठा आधार हरपला आहे. कोरोनासाथीमध्ये ते गरजूंच्या मदतीसाठी कार्यरत होते, अशा शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत.

शेख हे अहमदाबादमधील दानीलीमढा क्षेत्रातून निवडून आले होते. हा प्रभाग सध्या कोरोनोचा हॉटस्पॉट आहे. अहदाबाद मनपामध्ये ते 2010 ते 2015 या कालावधीमध्ये विरोधीपक्ष नेते म्हणून कार्यरत होते. दरम्यान, गुजरातमध्ये कोरोना बाधितांची संख्या 3017 झाली असून आतापर्यंत 133 जणांचा मृत्यु झाला आहे. तर 282 रुग्ण खडखडीत बरे झाले आहेत. तर अहमदाबादमध्ये 2181 रुग्णांची नेंद झाली असून 104 जणांचा मृत्यु झाला आहे.

Related Stories

देहरादूनमधील प्राचीन मंदिर टपकेश्र्वर बंद; पुजारी कोरोना पॉझिटिव्ह

pradnya p

दिल्लीत लॉक डाऊन वाढवण्याची कोणतीही योजना नाही : अरविंद केजरीवाल

pradnya p

रघुवंश प्रसाद सिंह यांचं कोरोनाने निधन

Shankar_P

अजमल यांनी फेकला ‘गमोसा’

Amit Kulkarni

दिल्लीत 3609 नवे कोरोना रुग्ण; 19 मृत्यू

pradnya p

ट्रम्प अहमदाबादमध्ये दाखल, मोदींकडून गळाभेट

tarunbharat
error: Content is protected !!