तरुण भारत

ब्रिटीश ग्रां प्रि शर्यत प्रेक्षकविना होणार

वृत्तसंस्था/ लंडन

एफ-वन मोटार रेसिंग क्षेत्रातील ब्रिटीश ग्रां प्रि मोटार शर्यत ठरलेल्या वेळेप्रमाणेच 19 जुलै रोजी घेतली जाणार असून या शर्यतीला प्रेक्षकांच्या उपस्थितीवर बंदी घालण्यात आली असून सदर शर्यत बंदीस्त रूपात घेतली जाणार असल्याचे  सिल्व्हरस्टोन आयोजकांनी सोमवारी येथे सांगितले.

कोरोना व्हायरस महामारीमुळे एफ-वन मोटार रेसिंग क्षेत्रातील अनेक शर्यती लांबणीवर किंवा रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच घोषित करण्यात आला आहे. 28 जून रोजी पॅरीसमध्ये होणारी प्रेंच एफ-वन ग्रां प्रि मोटार शर्यत रद्द करण्यात आली आहे पण 19 जुलै रोजीची ब्रिटीश ग्रां प्रि मोटार शर्यतीबाबत रद्द किंवा लांबणीवर टाकण्याचा अंतिम निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही, असे स्पर्धा आयोजन समितीचे व्यवस्थापक संचालक स्टुअर्ट प्रिंगल यांनी सांगितले. सदर शर्यत बंदीस्त स्वरूपात घेतली जाण्याची शक्यता असून प्रेक्षकांना प्रवेश बंदी करण्यात येईल. कोरोना व्हायरसमुळे ब्रिटनमध्ये आतापर्यंत  20 हजार लोकांचा मृत्यू झाला असून लाखो लोकांना याची बाधा झाल्याचे सांगण्यात आले. ऑस्ट्रेलिया, मोनॅको आणि फ्रान्समधील एफ-वन ग्रां प्रि मोटार शर्यती रद्द करण्यात आल्या असून बहरीन, चीन, व्हिएनाम, हॉलंड, स्पेन, अझरबेजान आणि कॅनडा येथील ग्रां प्रि मोटार शर्यती लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.

Related Stories

पीव्ही सिंधूचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात

Patil_p

टी-20 : न्यूझीलंड-विंडीज आज आमनेसामने

Patil_p

रूमानियाच्या हॅलेपची विजयी सलामी

Patil_p

ऑस्ट्रेलिया दौऱयात 5 कसोटी होणे अशक्य

Patil_p

पाक महिला क्रिकेट संघाला अक्रम, आझम यांचे मार्गदर्शन

Patil_p

जेसॉन होल्डरसाठी ‘टर्निंग पॉईंट’

Patil_p
error: Content is protected !!