तरुण भारत

उमर अकमलवर तीन वर्षांची बंदी

वृत्तसंस्था/ लाहोर

पाकच्या क्रिकेट क्षेत्रामध्ये नेहमीच वादग्रस्त ठरलेला फलंदाज उमर अकमल याच्यावर पीसीबीने तीन वर्षांच्या कालावधीसाठी बंदी घालण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. मॅच फिक्सिंग प्रकरणात आपला अहवाल तो सादर करू न शकल्याने त्याला दोषी ठरविण्यात आले.

Advertisements

30 वर्षीय उमर अकमलला आता तीन वर्षांच्या कालावधीत क्रिकेटशी संबंधित कोणत्याही प्रकारात सहभागी होता येणार नाही, असे पीसीबीने सांगितले आहे. उमर अकमलच्या या बंदी कालावधीला 20 फेब्रुवारीपासून प्रारंभ करण्यात आला आहे. कारण यापूर्वी सदर प्रकरणी पीसीबीने त्याच्यावर हंगामी स्वरूपात निलंबनाची कारवाई केली होती. उमर अकमलने 16 कसोटीत, 121 वनडे आणि 84 टी-20 सामन्यांत पाकचे प्रतिनिधीत्व केले आहे.

Related Stories

फुटबॉल सम्राट पेले नाबाद 80

Patil_p

बीजिंग ऑलिम्पिकमधून उत्तर कोरिया निलंबित

Amit Kulkarni

फुटबॉल सम्राट पेले यांच्या प्रकृतीत सुधारणा

Patil_p

विराट-अनुष्काची मुंबई पोलिसांना 10 लाखांची मदत

Patil_p

हॉकी मानांकनात वर्षअखेरीस भारत चौथ्या स्थानी

Patil_p

विश्व कनिष्ठांची बॅडमिंटन स्पर्धा जानेवारीत

Patil_p
error: Content is protected !!