तरुण भारत

गोरखपूर : तीन महिन्याच्या बाळाची कोरोनावर मात

ऑनलाईन टीम / गोरखपूर  :

संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. भारतात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने फैलावत चालला आहे. त्यातच उत्तर प्रदेश मधून एक आनंदाची बातमी आली आहे. 

Advertisements


उत्तर प्रदेशमध्ये दोन आठवड्यांपूर्वी एका तीन महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झाली होती. परंतु आता दोन महिन्यांनंतर तीन महिन्यांच्या कोरोना पॉझिटिव्ह बाळाने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. हे बाळ आता पूर्णपणे बरं झालं असून त्याला डिस्चार्जही देण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एका कोरोना पॉझिटिव्ह नातेवाईक या बाळाच्या संपर्कात आल्यामुळे या बाळाला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता होती. त्यामुळे या बाळावर आणि त्याच्या आईवरही गेल्या आठ – दहा दिवसांपासून उपचार सुरु होते. यात या बाळाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. तर आईचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 

या बाळामध्ये तापा व्यतिरिक्त कोणतीच लक्षणे दिसत नव्हती. त्यामुळे सुरुवातीला त्याला पॅरासिटामोल देण्यात आलं. परंतु आईच्या दुधापासून प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे बाळावर इतर कोणतेही उपचार करण्यात आले नाहीत आणि तो कोणत्याही इतर औषधांविना बरा झाला. 

दोन दिवसांपूर्वी या  बाळाची पुन्हा टेस्ट करण्यात आली. यामध्ये त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. 

Related Stories

मोदी सरकारचा सीबीआय आणि ईडी प्रमुखांच्या कार्यकाळासंबंधी मोठा निर्णय

Abhijeet Shinde

‘पीओके’ ताब्यात घेण्यास लष्कर तयार : लष्करप्रमुख

prashant_c

कोरोना उपचारासंदर्भात नव्या गाईडलाईन्स जारी

Patil_p

अमेरिकेत कोरोनाबळींनी ओलांडला एक लाखाचा टप्पा

datta jadhav

सचिन वाझेंना ‘एनआयए’कडून अटक

datta jadhav

मध्यप्रदेशात राजकीय भूकंप; कमलनाथ सरकारमधील मंत्र्यांचे राजीनामे

tarunbharat
error: Content is protected !!