तरुण भारत

राज्यात हळूहळू लोकांची लगबग सुरु

प्रतिनिधी / पणजी

कोरोना महामारीमुळे जगातील अनेक देश लॉकडाऊनच्या स्थितीत आहे.  भारतात देखील लॉकडाऊनमुळे अनेक राज्ये, शहरे बंद स्थितीत आहे. परंतु गोवा कोरोनामुक्त झाल्यामुळे राज्याला काही प्रमाणात सध्या सुट मिळाली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पालिका, पंचायत स्तरावर परवानगी घेऊन दुकाने खुली करावी असे आवाहन केल्यानंतर राज्यात व राजधानी पणजी येथे अनेक दुकाने, शोरुम, हॉटेल्स खुली झालेली दिसून येत आहे व याच्यासोबत हळूहळू लोकांची लगबग सुरु झाली आहे.

Advertisements

काही पाळतात सामाजिक आंतर, काही पाळत नाहीः

दुकाने, शोरुम, खुली झाल्यामुळे लोकांची गर्दी या दुकानांवर पाहायला मिळत आहे. काहीजण सामाजिक आंतर पाळत आहे तर काहीजण पाळत नाही आहे असे दिसून येत आहे. त्यामुळे सरकारने दिलेल्या या सुटमध्ये लोकांनी विसरुन जाता कामा नये की आमच्या शेजारच्या राज्यात व देशाच्या इतर राज्यात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. लोकांनी स्वतःहून सावधगीरीने वागणे व वावरणे आवश्यक आहे.

पोलिसांच्या बंदोबस्तात व्यवहार सुरुः

विनाकारण फिरणाऱयावर, वाहतूक नियम मोडणाऱयावर सध्या पोलिस कडक कारवाई करत आहे. तसेच यासोबतच दुकाने, शोरुम, दालने खुली झाल्यामुळे प्रत्येक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पोलिस बंदोबस्त आहे. त्यामुळे पोलिस बंदोबस्तातच सध्या व्यवहार सुरु आहे.

मुख्य मार्केट असणार बंदः

सर्व भागातील मुख्य मार्केट अजून काही कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय सध्या पालिकेने घेतलेला आहे. याचबरोबर स्पा, सलुन, पब, बार, हे देखील बंद असणार आहे. या व्यतिरीक्त इतर काही दुकाने आहे त्या टप्प्याटप्याने खुली होणार आहे. परंतु यासर्व गोष्टीमध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव व सामाजिक आंतर ठेवणे लोकांनी विसरु नये.

Related Stories

दहावी, बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Patil_p

पावसाने गोव्याला झोडपले

Amit Kulkarni

गोंयचो आवाज’ची आज पेडणेत कॅ?सिनो विरोधात सभा

Patil_p

वाळपई सार्वजनिक गणेशोत्सवाचे कार्य मोलाचे : प्रतापसिंह राणे

Amit Kulkarni

नवीन शैक्षणिक वर्ष 21 पासून

Amit Kulkarni

शासकीय शिमगोत्सव समितीतर्फे देवी महालसेला नमन

Amit Kulkarni
error: Content is protected !!