तरुण भारत

पोलीस निरीक्षक संदेश चोडणकरांना निलंबित करून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करा

मंत्री मायकल लोबो यांची मागणी

प्रतिनिधी / म्हापसा

Advertisements

पेडणे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर हे सध्या भ्रष्टाचारात माजलेले आहेत. त्यांच्यावर खुनाचा आरोप असून बिस्मार्क खून प्रकरणी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अडीच वर्षे निलंबित ठेवले होते. त्यांच्या निधनानंतर आपल्या गॉडफादरच्या आधारे त्यांनी पेडणे पोलीस स्थानकाचा ताबा मिळविला. चौकशी न संपताच त्यांना पोलीस स्थानक कसे देण्यात आले. पोलीस खात्यात सर्वात जास्त भ्रष्टाचारी अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या मालमत्तेची तसेच त्यांनी आडमार्गाने पैसे कसे मिळविले, त्यांच्याकडे संपत्ती किती आहे याची चौकशी करावी व मुख्यमंत्र्यांनी निरीक्षक चोडणकर यांना त्वरित निलंबित करावे अशी मागणी कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

निरीक्षक चोडणकर रेतीच्या ट्रकमागे 500 रुपयांची मागणी करतात जे कुणी देत नाही त्यांना पोलीस स्थानकात नेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंद करतात. पर्रा येथील दोन ट्रक पकडले असता 500 रुपयांची आकारणी केली. ते दिले नाही म्हणून ट्रक ताब्यात घेतले. आपण त्यांना फोन करून ट्रक सोडण्यास सांगितले असता तसे असेल तर मुख्यमंत्र्यांना आपल्यास फोन लावण्यास सांगा असा दमही देण्यात आला. मुख्यमंत्री त्यांचे गॉडफादर आहेत काय असा प्रशअन मंत्र्यांना केला असता त्यांनी नकार दिला. माजी मुख्यमंत्र्यांनी त्याला अडीच वर्षे निलंबित ठेवले होते तेच योग्य होते. अशांना कायमस्वरूपी निलंबित करावे अशी मागणी लोबो यांनी केली.

चौकशी सुरू असताना पोलीस स्थानकाचा ताबा का?

मांद्रे, पेडणे पोलीस स्थानकाचे निरीक्षक योग्य असते तर पेडणे भागात मोठय़ा प्रमाणात अमली पदार्थ व्यवहार मोठय़ा प्रमाणात जप्त केला जाऊ शक् ाढला असता. दिल्ली, बेंगलोरचे जे रेस्टॉरंट चालवितात तेथे मोठय़ा प्रमाणात कोकेन व्यवहार चालत होता. आपण मंत्री म्हणून हा आरोप करतो. पणजी येथे सिप्रियान नामक इसमास संदेश चोडणकर यांनी गळफासावर लटकविले अशा निरीक्षकांना पोलीस स्थानकाचा ताबा देऊ नये. याबाबत लेखी पत्र आपण मुख्यमंत्री तसेच महानिरीक्षकांना मंगळवारी देणार आहे. त्यांना राजकीय पाठिंबा आहे हे आपल्यास माहीत आहे. जी चूक आहे ती चूक सर्वसामान्य इसमांना सांभाळण्याची आज गरज आहे.

पैसे गोळा करण्यासाठी पेडणेत ठेवले

या पोलीस निरीक्षकाला पैसे गोळा करण्यासाठी पेडणेमध्ये ठेवले आहे. कुणी ठेवले हे मुख्यमंत्र्यांनी शोध घ्यावा. अशा पोलीस अधिकाऱयांना आम्ही बळ देऊ लागलो तर आमचे नाव खराब होणार. लेखी तक्रार दिल्यावर त्यांच्यावर काय कारवाई होईल हे आपण पाहणार आहे. स्व. पर्रीकरांनी त्यांच्यावर अन्याय केला नव्हता तर योग्य कारवाई केली होती. त्यांना अडीच वर्षे निलंबित ठेवले होते असे मंत्री लोबो म्हणाले.

अशा अधिकाऱयांमुळे सरकार बदनाम होते

ड्रग्सचा व्यवहार करायला देतात व त्यांच्याकडून पैसे आकारतात. या निरीक्षकाची किती मालमत्ता आहे, किती दुकाने आहेत, फ्लेट, संपत्ती अन्य कुणाच्या नावावर ठेवले त्यांची चौकशी होणे आवश्यक आहे. मी सरकार पक्षात असल्याने हे बोलणे योग्य नव्हे मात्र असे पोलीस अधिकारी सरकार पक्षात असतात ते सरकारला बदनाम करतात आणि सरकारच्या नावे हे पैसे आकारतात. प्रत्येक ट्रकला 500 रुपये द्यावे लागते. येथे मोठय़ा पार्टी सुरू असतात आणि त्यांचा शोध  घेण्यासाठी दोन दिवस ते आंब्याजवळ शोधतात. हा शोध घेण्यासाठी अधीक्षक, महानिरीक्षकांना यावे लागते ही दुर्दैवी बाब आहे. मुख्यमंत्र्यांनी अशी प्रकरणे गांभीर्याने घेऊन अशा पोलीस अधिकाऱयांना काडून टाकावे अशी मागणी मंत्री लोबो यांनी केली. अशा अधिकाऱयांना आम्ही कधी माफ करू नये. मी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे असे ते म्हणाले.

निरीक्षक चोडणकरबाबत सर्व माहिती मागून घेणार

खून केला आणि सोडला. पोलीस अधिकारी म्हणून खून करू शकतो काय? त्यांच्यावर कारवाई सुरू आहे मात्र त्यांच्यामागे अद्याप कुणी लागला नाही. ही केस कुठे पोहोचली, आरोपत्र दाखल केले काय, दोन वर्षे निलंबित केले म्हणून केस संपली काय? ही कारवाई कुठे पोहोचली. पेडणेत दादागिरी चालली ती कधी संपणार. त्यांनी आजवर जे भ्रष्टाचार केले आहे त्या सर्वांची माहिती कारवाई आपण मागणार आहे. याबाबत भ्रष्टाचार विरोधी पथक, मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र लिहिणार असे मंत्री लोबो यांनी सांगितले. असे अधिकारी आम्हाला नको आहे. गॉडफादरच्या आधारे सेटींग करून हे पोलीस स्थानकाचा ताबा मिळवितात असे अधिकारी आम्हाला नको.

Related Stories

ईस्ट केपे कंझ्युमर्स को-ऑप. सोसायटी निवडणुकीचा निकाल

Amit Kulkarni

चांदर येथे तरूणीला भर दिवसा दोन युवकांनी ‘डेटॉल’ पाजले

Patil_p

जीएसएलतर्फे गोव्याला ऑक्सजिन जनरेटिंग प्लांट

Amit Kulkarni

आंबेडकर उद्यानाकडील झाड उमळून पडले

Patil_p

कोरोनासंबंधी माहिती पाठविताना खातरजमा करा

Omkar B

काणकोणात मास्क न वापरता फिरणाऱया 60 जणांना दंड

Omkar B
error: Content is protected !!