तरुण भारत

नीती आयोगाच्या एका अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा, पूर्ण बिल्डिंग सील

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. त्यातच दिल्लीतून एक चिंता वाढवणारी बातमी येत आहे. नीती आयोगाच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ही इमारत तातडीने सील करण्यात आली आहे. 

Advertisements

याबाबत माहिती देताना नीती आयोगाचे उप सचिव अजित कुमार यांनी सांगितले की, नीती आयोग भवनाच्या इमारतीतील कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळल्याने आम्ही आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सगळ्या निर्देशांचे पालन करतो आहोत. ही इमारत तातडीने सील करण्यात आली आहे. तसंच या इमारतीचं सॅनिटायझेशनही करण्यात येतं आहे. 


पुढे ते म्हणाले, ज्या कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली आहे त्याच्या संपर्कात आलेल्यांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे.


दरम्यान, सध्या दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारांच्या वर पोहचली असून 54 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर 877 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

Related Stories

सीमेवर भारताचीही जोरदार सज्जता

Patil_p

राष्ट्रपतींकडून महिलांच्या सुरक्षेचा आणि सन्मानाचा संकल्प

tarunbharat

जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 525 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Rohan_P

ट्रम्प यांच्यावरील ‘त्या’ वादग्रस्त पुस्तकाचा पहिल्याच दिवशी विक्रमी खप

datta jadhav

आज राज्यव्यापी बंद

datta jadhav

‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

datta jadhav
error: Content is protected !!