तरुण भारत

मालेगावात आज 36 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

ऑनलाईन टीम / नाशिक : 

नाशिकमधील मालेगावात आज 36 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये 21 पुरुष, 14 महिला आणि एका 9 वर्षीय मुलाचा समावेश आहे. मालेगावातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 162 वर पोहचली आहे.

Advertisements

मालेगावात एकाच दिवशी 36 नवे रुग्ण आढळल्याने शहरवासीयांची चिंता वाढली आहे. नव्या 36 रुग्णांपैकी चौघांचे अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने प्रथमच पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनालाही धक्का बसला आहे. 

मालेगाव शहरातील एकूण 14 परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. मालेगावमधील मोमीनपुरा, कमालपुरा, मदिना बाग, इस्लामाबाद, आझाद नगर, दत्त नगर हे भाग झोपडपट्टीचे आहे. तर इतर भाग हा चांगला, तर काही दाट लोक वस्ती असलेला भाग आहे. त्यामुळे ही रुग्णांची संख्या वाढत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Related Stories

महाराष्ट्रातील लॉकडाऊन काही आठवडे वाढण्याची शक्यता

prashant_c

नंदुरबारमध्ये आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

prashant_c

‘ताज’ हॉटेलमधील 6 कर्मचारी कोरोनाबाधित

prashant_c

यवतमाळ : एसटी बसच्या भीषण अपघातात 4 मजूर ठार, 15 जखमी

datta jadhav

विधानपरिषदेसाठी भाजपकडून ‘ही’ नावे निश्चित

datta jadhav

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 20 हजारांपार

datta jadhav
error: Content is protected !!