तरुण भारत

अक्षय कुमारकडून मुंबई पोलीस फाऊंडेशनला 2 कोटींची मदत

ऑनलाईन टीम / मुंबई :

अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा मदतीसाठी धावून आला आहे. अक्षय कुमार ने मुंबई पोलीस फाऊंडेशनला दोन कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ही माहिती आपल्या ट्विटर अकाउंट वरून दिली.

Advertisements

ते आपल्या ट्विट मध्ये लिहितात की, अभिनेता अक्षय कुमार ने मुंबई पोलीस फाऊंडेशनला दोन कोटी रुपयांची मदत दिली आहे. या मदतीसाठी मी त्यांचे आभार मानतो. तसेच आपण केलेली मदत मुंबई पोलीसांच्या त्या महिला आणि पुरुषांच्या सुरक्षेसाठी सहकार्य करेल, जे आपल्या सुरक्षेसाठी प्रतिबद्ध आहेत. 

याला उत्तर देताना अक्षय कुमारने कोरोनामुळे आपला जीव गमावलेले हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पेंडुरकर आणि संदीप सुर्वे यांना श्रद्धांजली वाहिली तसेच अक्षयने यावेळी आपल्या चाहत्यांनाही पोलीस फाऊंडेशनला मदत करण्याचे आवाहन केले आहे.


दरम्यान, या आधीही अक्षय ने पी एम केअर फंडात 25 कोटी आणि बीएमसीला 3 कोटींची मदत केली आहे. 

Related Stories

सीपीएम नेता सीताराम येचुरी यांच्या मोठ्या मुलाचे कोरोनाने निधन

Rohan_P

कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन १३ ते २४ सप्टेंबर दरम्यान होणार

Abhijeet Shinde

सीबीआयच्या कारवाईमागे राजकीय सूडबुद्धी नसावी : संजय राऊत

Abhijeet Shinde

5 लाखांपर्यंतच्या ठेवींवर विमा सुरक्षा कवच

prashant_c

मोदी हैदराबादमध्ये दाखल; भारत बायोटेकच्या लसीचा घेत आहेत आढावा

datta jadhav

ठाणे, कल्याण डोंबिवलीत 2 ते 12 जुलैपर्यंत पुन्हा लॉक डाऊन

Rohan_P
error: Content is protected !!