तरुण भारत

‘त्या’ विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाठवणार 100 बस

ऑनलाईन टीम / मुंबई : 

लॉकडाऊनमुळे राजस्थानातील कोटा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील 2 हजार विद्यार्थ्यांना परत आणण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या 
100 बस येत्या दोन दिवसात कोटा येथे रवाना होतील, असे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.

Advertisements

परब म्हणाले,  स्पर्धात्मक प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी कोचिंग प्रशिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी कोटा येथे गेले आहेत. लॉकडाऊनमुळे तिथे अंदाजे 2 हजार विद्यार्थी अडकले आहेत. महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता असल्याने  या 2 हजार विद्यार्थ्यांना परत आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

विद्यार्थ्यांना आणण्यासाठी धुळे येथून कोटाला बस पाठविण्यात येणार आहेत. त्यासाठी राजस्थान आणि मध्यप्रदेश सरकारकडून बस वाहतुकीची परवानगी घेण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना प्रथम धुळे जिल्ह्यात आणले जाईल. त्यानंतर त्यांना मूळ ठिकाणी पाठवून 14 दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

Related Stories

महाराष्ट्रात आतापर्यंत 8232 पोलिसांना कोरोनाची बाधा; 93 पोलिसांचा मृत्यू

Rohan_P

अर्थव्यवस्थेत ४ दशकातील सर्वात मोठी घसरण

Amit Kulkarni

रेपो रेट जैसे थे!

datta jadhav

कोल्हापूर ब्रेकिंग : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची तीव्रता वाढली

Sumit Tambekar

महाराष्ट्राची विभागणी तीन झोनमध्ये

prashant_c

तालिबानकडून सरकार स्थापनेसाठी पाक, चीनसह 6 देशांना निमंत्रण

datta jadhav
error: Content is protected !!