तरुण भारत

पोलिसांना सॅनिटायझर आणि गरजूंना एक हात मदतीचा

ऑनलाईन टीम / पुणे :

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपल्या संरक्षणासाठी उतरलेल्या पोलिसांचा देखील सर्व घटकांइतकाच महत्वाचा वाटा आहे. त्यात असह्य उन्हाळा सुरु झाल्याने त्यांना काम करताना थकवा येतो. त्यामुळे हा थकवा कमी व्हावा, या हेतुने आनंदवन व्यसनमुक्ती व पुर्नवसन केंद्रातर्फे पोलिसांना गुल्कॉन-डी (उर्जा देणारे पेय), पाणी बॉटल व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. 

Advertisements


आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रासह पुणे शहर भाजप शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ तर्फे पोलिसांना या वस्तू देण्यात आल्या. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन शिवाजीनगर, जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व परिसर व फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता परिसरात झालेल्या उपक्रमात केंद्राचे अध्यक्ष डॉ.अजय दुधाणे, दत्तात्रय सोनार, प्रकाश पवार , पासलकर हे सहभागी झाले होते. 


एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत भाजपा शिवाजीनगर मतदारसंघाच्या वतीने काही नागरिकांना व गरजू महिलांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.

यामध्ये गव्हाचे पीठ, तांदूळ, गहू, साखर, तुरडाळ, तेल, मसाला पावडर, चहा पावडर, बेसन, साबण, हँड सॅनिटायझर चा सामावेश होता. आणखी 100 किटचे वाटप गरजवंताना करण्यात येणार आहे. 

Related Stories

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राजकीय नेत्यांकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा !

Abhijeet Shinde

‘या’ कारणासाठी इस्त्रायलनं मराठीत ट्विट करत मानले मुख्यमंत्री ठाकरेंचे आभार

Abhijeet Shinde

जानेवारीपासून लसीकरणाची तयारी ….

Patil_p

रत्नागिरी : आसुद डोंगराची भुगर्भ शास्त्रज्ञांनी केली पाहणी

Abhijeet Shinde

महिलांचे फोटो एडिट करत बदनामी करणाऱ्याला मुंबई पोलिसांनी केली अटक

Sumit Tambekar

Nashik Oxygen Leak : मुंबई उच्च न्यायालयाची सुमोटो याचिका; राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश

Abhijeet Shinde
error: Content is protected !!