तरुण भारत

औद्योगिक वसाहत सुरू करण्याच्या दृष्टीने चाचपणी करा

प्रतिनिधी/ बेळगाव

लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय बंद आहेत. 3 मे पर्यंत लॉकडाऊन राहणार असून, रूग्णांची संख्या वाढल्यास लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ होण्याची शक्मयत आहे. पण उद्योग व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने शासनाकडून विचार सुरू आहे. बेळगावची औद्योगिक वसाहत सुरू करण्याच्या दृष्टीने चाचपणी करण्याची सूचना रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱयांना मंगळवारी केली.

Advertisements

कोरोनाबाबत शहरातील कामकाजाबाबत मंगळवारी महापालिका कार्यालयात चर्चा झाली. यावेळी औद्योगिक वसाहत सुरू करण्याबाबतचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या दृष्टीने औद्योगिक वसाहत व अन्य व्यवसाय सुरू करणे गरजेचे आहे. पण हॉटस्पॉट म्हणुन घोषित करण्यात आलेल्या शहरांमध्ये व्यवसाय व औद्योगिक वसाहत सुरू करण्यासाठी मुभा देण्यात आली नाही. त्यामुळे बेळगावची औद्योगिक वसाहत बंद आहे. उद्यमबाग, ऑटोनगर, होनगा आदी ठिकाणी असलेल्या औद्योगिक वसाहतीमधील कारखाने सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी होत आहे. त्यामुळे महापालिका कार्यालयात झालेल्या बैठकीवेळी चर्चा झाली. मोजके कामगार आणि सामाजिक अंतर ठेवून काम करण्यास कोणतीच अडचण नाही. कंटेनमेंट परिसरातील कामगारांना बंदी घालून कारखाने सुरू करण्यास काही अडचणी आहेत का? याची चाचपणी करावी अशी सूचना रेल्वेराज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी महापालिका आयुक्त जगदीश के. एच., नोडल अधिकारी शशिधर कुरेर आणि एसीपी एन. बी. बरमणी यांना केली. याबाबत चाचपणी करून कारखाने सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी अशी सूचना केली. 

Related Stories

कणकुंबीत मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱयांना पिटाळले

Amit Kulkarni

यंदा शिक्षक बदली प्रक्रियेला ब्रेक

Patil_p

नागरिकांनी बसमधून प्रवास करावा

Patil_p

जिल्हा कब्बड्डी स्पर्धेत ताराराणी खानापूर, बैलहोंगल संघ विजेते

Amit Kulkarni

स्वच्छता करा,अन्यथा मनपाला कचरा भेट देवू

Patil_p

ग्लॅडिएटर्स, आनंद अकादमी संघ विजयी

Amit Kulkarni
error: Content is protected !!