तरुण भारत

फार्महाऊस फोडून सव्वालाखाच्या साहित्याची चोरी

प्रतिनिधी/ बेळगाव

बी. टी. पाटील उद्योग समूहाचे ज्येष्ठ व्यवस्थापक राजीव कुलकर्णी यांच्या बेनकनहळ्ळी जवळील के. एच. बी. कॉलनी शेजारी असलेल्या फार्महाऊसमध्ये चोरी झाली आहे. चोरटय़ांनी सुमारे सव्वालाखाचे साहित्य चोरले आहे.

Advertisements

राजीव कुलकर्णी हे सोमवार पेठ टिळकवाडी येथे राहतात. त्यांनी आपल्या शेताच्या चारही बाजूंनी उंच असे पत्राचे कंपाऊंड उभे केले आहे. त्याला नेहमी कुलुप लावलेले असते. या कंपाऊंंडच्या आतमध्ये एक छोटेसे घर उभारलेले आहे. या घरात चोरीची घटना घडली आहे.

चोरटय़ांनी 85 हजार रुपये किमतीचे डिझेल जनरेटर, 30 हजार किमतीचे कटिंग मशीन, साडेसात हजार रुपये किमतीचे 1 एचपीची इलेक्ट्रिक मोटर, चार हजार किमतीची किटकनाशक फवारणी पंप चोरले आहेत. लॉकडाऊनच्या काळात कुलुप तोडून चोरटय़ांनी घरात प्रवेश केला असून साहित्याबरोबरच शेतातील फळेही चोरण्यात आले आहेत. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

कर्नाटक आणि केरळ सरकारला हायकोर्टाकडून नोटीस

Abhijeet Shinde

पोलीस अधिकाऱयांच्या बदल्या

Omkar B

बाजारपेठेत भाज्यांचे दर आवाक्यात

Patil_p

राज्याचे उच्च शिक्षणमंत्री सुरेश कुमार आज खानापूर दौऱयावर

Amit Kulkarni

उन्नती संस्थेला कॉमन फॅसिलिटी सेंटर मंजूर

Omkar B

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध

Amit Kulkarni
error: Content is protected !!