तरुण भारत

रामलिंगखिंड गल्लीत सॅनिटायझर फवारणी

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोना विषाणूंचा प्रसार वाढत असल्याने शहरात धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालल्याने सॅनिटायझर फवारणी करण्याची मागणी वाढत आहे. यामुळे माजी महापौर सरिता पाटील यांनी रामलिंगखिंड गल्ली परिसरात महापालिकेच्या माध्यमातून सॅनिटायझर फवारणी करवून घेतली.

शहर व परिसरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून लॉकडाऊन करून कोरोनाची लढाई सुरू आहे. पण काही ठिकाणी रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याने स्वच्छतेची आणि सॅनिटायझरची फवारणी करण्याची मागणी होत आहे. रामलिंगखिंड गल्लीमधून होम क्वारंटाईन व्यक्तीना घेऊन वाहने ये-जा करीत आहेत. रामलिंगखिंड गल्ली, कोनवाळ गल्ली अशा विविध परिसरात औषध फवारणी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे याची दखल घेऊन माजी महापौर सरिता पाटील यांनी महापालिकेच्या अधिकाऱयांना याची माहिती दिली. तातडीने औषध फवारणी करण्याची सूचना महापालिकेच्या अधिकाऱयांना केली होती. यामुळे सोमवारी रामलिंगखिंड गल्लीसह विविध परिसरात सॅनिटायझर फवारणी करण्यात आली.

Related Stories

संगीताने दिला वृद्धांना आनंद

Patil_p

दिवाळीनिमित्त धावताहेत 35 जादा बसेस

Patil_p

कायदा हातात घेणाऱयांवर कारवाई

Patil_p

प्रशासक नेमण्याचा निर्णय मागे घ्या

Amit Kulkarni

बेळगाव- बेंगळूर रेल्वेला केवळ 29 टक्केच प्रवासी

Patil_p

जुना महात्मा फुले रोडवरील गटार बांधकामाला आक्षेप

Patil_p
error: Content is protected !!