तरुण भारत

केदारनाथ धामची कवाडं उघडली

ऑनलाईन टीम / केदारनाथ : 

 ग्रीष्काळासाठी उत्तराखंडमधील केदारनाथ धामची कवाडं आज सकाळी खुली करण्यात आली. सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी केदारनाथ धामची कवाडं उघडल्यानंतर पुजार्‍यांनी बाबा केदारनाथ यांची पारंपारिक पद्धतीने जप व विधी करुन पूजा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे ही पहिली पूजा करण्यात आली.

Advertisements

पहिल्या पूजेसाठी केदारनाथ धाम 10 क्विंटल फूलांनी सजवण्यात आले आहे. मंदिराच्या पूजेच्या वेळी सामाजिक अंतरावर विशेष लक्ष दिले गेले.  केदारनाथ धाममध्ये 4 ते 6 फूट बर्फ गोठविला आहे. बर्फाचे थर तोडून मंदिर संकुलापर्यंत जाण्यासाठी एक मार्ग तयार केला आहे.  केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याच्या वेळी भाविकांची गर्दी नसताना हे प्रथमच घडले आहे.

पुढील 6 महिने येथे केदारनाथ बाबांची पूजा होणार आहे. लॉकडाऊनमुळे भाविकांना मंदिरात जाण्याची परवानगी नाही. सध्या केवळ देवस्थान बोर्डच्या 16 सदस्यांनाच पूजा करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Related Stories

सरन्यायाधीश पदासाठी एन.व्ही रमण यांच्या नावाची शरद बोबडेंची केंद्राकडे शिफारस

Abhijeet Shinde

सीबीएसई बारावी परीक्षेवर दोन दिवसांमध्ये निर्णय

Amit Kulkarni

बिहार : समस्तीपूर जिल्ह्यातील सिव्हिल सर्जनचे कोरोनामुळे निधन

Rohan_P

कर्नाटकात ’बंद’चा फज्जा

Patil_p

चीनसोबत तणाव, बोफोर्स होणार तैनात

Patil_p

आग्य्राचे युवक आत्मनिर्भरतेचे पायिक

Patil_p
error: Content is protected !!