तरुण भारत

कराडमध्ये आता भिलवाडा पॅटर्न

किराणा, भाजीपाला मिळणार घरपोच

नगरसेवक, स्वयंसेवकांची घेतली जाणार मदत

Advertisements

कराड / प्रतिनिधी


कराड शहरालगतच्या गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने हा परिसर कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला असून 23 एप्रिलपासून या भागात शंभर टक्के लॉक डाऊन आहे. सहा दिवस रुग्णालय वगळता शहरातील सर्व सेवा ठप्प आहे. या पार्श्वभूमीवर किराणा वस्तू व भाजीपाला याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे 1 मे पासून कराड शहरात घरपोच किराणा व भाजीपाला राबवण्यात येणार आहे. कराड शहरातील सर्व 33 नगरसेवकांच्या मदतीने ही योजना भिलवाडा, बारामती पॅटर्नच्या धर्तीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राबवण्यात येणार आहे. या योजनेच्या पूर्वतयारीची बैठक मंगळवारी सायंकाळी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन पार पडली.

इन्सिडेंट कमांडर कमांडर तथा प्रांताधिकारी उत्तम दिघे, पोलीस उपाधीक्षक सुरज गुरव, नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर.पाटील, मुख्याधिकारी यशवंत डांगे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, गटनेते राजेंद्रसिंह यादव, सौरभ पाटील, सभापती विजय वाटेगावकर, स्मिता हुलवान, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, हणमंत पवार, फारुक पटवेकर यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
कराड परिसरातील गावांमध्ये कोरोणाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सुमारे एक लाख लोकसंख्या असणाऱ्या कराड शहरात प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रशासन सतर्क आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कराडसह लगतच्या गावांमध्ये कंटेनमेंट झोन जाहीर केला असून 23 एप्रिल पासून शंभर टक्के लॉक डाऊन करण्यात आला आहे. गेले सहा दिवस घरपोच दूध वगळता कोणत्याही गोष्टीची सवलत देण्यात आली नाही. या पार्श्वभूमीवर किराणा वस्तू व भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला असून नागरिक याची मागणी करू लागले आहेत.त्यामुळे एक मेपासून घरपोच किराणा वस्तू व भाजी-पाला घरपोच देण्यात येणार आहे. याचे नियोजन नगरसेवकांकडे देण्यात आले असून त्यात या प्रभागातील नगरसेवकांनी आपल्या प्रभागात नागरिकांना घरपोच किराणा व भाजीपाला द्यायचा आहे. यासाठी स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे.

कोरोनचा प्रादुर्भाव लक्षात घेता एक मेपासून पुढील आठ दिवस तसेच त्यानंतरच्या काळात पुढील निर्णय होईपर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे. यात गहू, तांदूळ, तेल, तूरडाळ, चटणी अशा आठ किराणा वस्तू एकत्रितपणे किट स्वरूपात नागरिकांना घरपोच देण्यात येणार आहेत. मागणीप्रमाणे त्याचे पैसे नागरिकांनी द्यावयाचे आहेत. शिवाय ही योजना यशस्वी झाल्यानंतर भाजीपालाही याच पद्धतीने कीट स्वरूपात देण्यात येणार आहे. एकाच दराने वस्तू होणार असून त्याचा काळाबाजार रोखणे शक्‍य होणार आहे. कराड शहराचे 14 प्रभाग असून त्यातून प्रत्येकी दोन किंवा तीन नगरसेवक निवडून आले आहेत. त्या-त्या प्रभागात नगरसेवकांनी स्वयंसेवकांच्या मदतीने घरपोच सेवा देणारी यंत्रणा उभी करायची आहे यात औषधांचाही समावेश आहे.

मंगळवारी झालेल्या बैठकीत प्रारंभी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी योजनेचे स्वरूप समजावून सांगितले. त्यानंतर नगरसेवकाने त्यांच्या शंका मांडल्या. त्यास उत्तरे देण्यात आली. प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी या योजनेचे स्वरुप सांगत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकांनी घरातच थांबावे. त्यांना वस्तू घरपोच करण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे शहरात भाजीपाला विक्रीस परवानगी दिली जाणार नाही. त्याऐवजी घरपोच भाजीपाला आणि किराणा देण्यात येणार आहे. नागरिकांनी घरात घरातच राहून सहकार्य करावे, असे आवाहन केले. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी प्रशासन ज्या पद्धतीने सांगेलं, त्या पद्धतीने ही योजना शहरात राबवण्यासाठी सर्व नगरसेवक सहकार्य करतील , अशी ग्वाही दिली. या योजनेस मूर्त स्वरूप आल्यानंतर त्याची अधिकृत घोषणा प्रशासनाकडून केली जाणार आहे.

Related Stories

‘बर्ड फ्लु’च्या संकटाने व्यावसाईक धास्तावले

Shankar_P

पंतप्रधान आणि लष्करप्रमुखांनी दानवेंच्या वक्तव्याची दखल घ्यावी : संजय राऊत

pradnya p

सव्वा लाखाची लाच घेणाऱया सागर शिगावकरला अटक

triratna

सातारा : पालिकेच्या धडक पथकाकडून एका दिवसात दहा हजारांचा दंड वसूल

triratna

उस्मानाबाद जिल्हयात लॉकडाऊन ‘या’ तारखेपर्यंत राहणार

Shankar_P

सिव्हिलच्या कोविड सेंटरमध्ये पाण्याचा ठणाणा

datta jadhav
error: Content is protected !!