तरुण भारत

ज्येष्ठ क्रिकेटपटु बाबू खानापूरकर यांचे दुःखद निधन

प्रतिनिधी / बेळगाव

मुळचे बेळगावचे सध्या कांदिवली मुंबई येथील रहिवासी ज्येष्ठ क्रिकेटपटू प्रकाश उर्फ बाबू नारायण खानापूरकर (वय 73) मंगळवार दि. 28 रोजी हृदयविकाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी पल्लवी, मुंबई रणजी क्रिकेटपटु पराग खानापूरकर व सून राजश्री खानापूरकर असा परिवार आहे.

Advertisements

बाबू खानापूरकर यांचे शालेय शिक्षण ठळकवाडी स्कूल तर महाविद्यालयीन शिक्षण गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयात झाले. बाबू खानापूरकर यांनी शालेय शिक्षण घेत असताना ठळकवाडी स्कूलच्या क्रिकेट संघातून सराफ शिल्ड, चौगुले शिल्ट, लठ्ठे शिल्ड अशा प्रतिष्ठेच्या क्रिकेट स्पर्धेत त्यांनी आपल्या अष्टपैलू खेळाचे दर्शन घडविले होते.

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबई येथील महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह बँकेत नोकरी केली. यावेळी बाबू खानापूरकर यांनी मुंबई, गुजराथ, राजस्थान, कलकत्ता, पुणे, कोल्हापूर, सांगली, उगार खूर्द आणि बेळगाव येथे अनेक निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत भाग घेऊन उपस्थित क्रिकेट शौकिनांची मने जिंकली होती.

Related Stories

शहराच्या प्रवेशद्वारावरच कचऱयाची समस्या

Amit Kulkarni

जिल्हय़ात रविवारी 65 नवे रुग्ण

Amit Kulkarni

टी-20 क्रमवारी – कोहलीची प्रगती, राहुल स्थिर

Patil_p

एस. जी. बाळेकुंद्रीमध्ये नूतन विद्यार्थ्यांचे स्वागत

Amit Kulkarni

‘कुंदकला’तर्फे प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ

Omkar B

जिजामाता चौकमध्ये वाहनधारकांची चौकशी

Patil_p
error: Content is protected !!