तरुण भारत

विरोधकांना झाले आहे तरी तरी काय?

जगभर पसरलेल्या कोरोना महामारीने दीड लाखापेक्षा अधिक लोकांचा बळी घेतला असतानाच जवळपास सगळय़ाच व्यवसायांना फटका बसल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. श्रीमंतांची श्रीमंती कमी झाली तर गरिबांची गरिबी आणखी वाढली. कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्थेच्या होणाऱया नुकसानीला तोंड देण्यासाठी भारत सरकारने सुरुवातीला 1.70 लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केल्यानंतर विविध क्षेत्रांना आणखी काही सवलती जाहीर केल्या. रिझर्व बँकेनेही छोटे आणि मध्यम व्यावसायिक, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि बिगर बँकिंग क्षेत्र यांना मदत होईल व अर्थव्यवस्थेत रोकड सुलभता वाढावी म्हणून एक लाख, तर म्युच्युअल फंडासाठी 50 हजार कोटी मंजूर केले आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात देशभरातील 20 कोटी घरांमध्ये केंद्र सरकारकडून डाळीचे वितरण करण्यात येणार आहे. गेल्याच महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक वितरण प्रणालीला जोडलेल्या कुटुंबांना 1 किलो मोफत डाळ देण्याची घोषणा केली होती. आतापर्यत 30,000 टन डाळीचे वितरण करण्यात आले आहे. लॉकडाऊन काळात शेती आणि साहित्य विक्री करणाऱया दुकानांना परवानगी दिल्याने शेतीची तयारी सुरूही झाली आहे.

जागतिक महाशक्ती असलेल्या आणि ओसामा बिन लादेन वा जगातल्या कुठल्याही दहशतवादाला आव्हान देणाऱया अमेरिकेने कोरोनापुढे गुडघे टेकले असताना तुलनेत चौपट लोकसंख्या व अगदीच दुबळी आरोग्य यंत्रणा हाताशी असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समर्थपणे कोरोनाशी दोन हात केल्याने त्यांचे जगभरात कौतुक होत आहे. खुद्द अमेरिकाही मोदींचे गुणगान करीत आहे. सध्या ग्लासगोमध्ये असलेले पीओकेमधील नेते अमजद अयुब मिर्झा म्हणाले, की कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी घेतलेला जनता कर्फ्यूचा निर्णय  कौतुकास्पद आहे. यातून मोदींचे नेतृत्वगुण दिसतात.

Advertisements

औद्योगिक क्षेत्रातील नामवंत कंपनी मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स यानी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी पंतप्रधान म्हणून तुम्ही आणि तुमच्या सरकारने केलेल्या उपाययोजना खरोखरच कौतुकास पात्र आहेत. लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यासाठी वेळेत घेतलेला लॉक डाऊनचा निर्णय, देशातील हॉटस्पॉटची वर्गवारी, तसेच आरोग्यविषयक केलेल्या सोयी-सुविधा यांचे नियोजन उत्तमरित्या केले आहे, तसेच भारत सरकारने कोरोना विषाणूच्या ट्रकिंग, टेसिंग आणि आरोग्य सेवेतील लोकांशी संपर्कात राहण्याकरता बनवलेल्या आरोग्य सेतू ऍपचेही त्यांनी कौतुक केले आहे. स्वीडन व इस्राएलच्या पंतप्रधानांनीही भारताने केलेल्या औषधांच्या मदतीबद्दल पंतप्रधानांना फोन करून भारत करीत असलेल्या प्रयत्नाचे कौतुक केले आहे. पण याचे श्रेय स्वतःकडे न घेता संकटाच्या काळात भारताने जगाला आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवले. त्यामुळेच आज भारताचे आभार मानले जात आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात म्हटले आहे. पुढच्या ‘मन की बात’ पर्यंत जगात कोरोनाबाबत दिलासा मिळाल्याची बातमी मिळेल, असा विश्वास देखील मोदींनी व्यक्त केला. कोरोनाची साथ येईल हे कुणालाही माहीत नव्हते. पण मोदींनी केलेल्या काही खास कामामुळे कोरोनाशी यशस्वीपणे लढण्यासाठी सहाय्य होत आहे. देशभरात 10 कोटी टॉयलेट्स बांधल्यामुळे स्वच्छता व सोशल डिस्टन्सिंग सोपे झाले. 8 कोटी मोफत गॅस जोडण्या दिल्यामुळे या कठीण काळात गरीब महिलांना मोफत गॅस सिलिंडर देणे सोपे झाले आणि सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे 36 कोटी नवीन बँक खाती उघडल्यामुळे आज शेतकरी, मजूर, खायची भ्रांत झालेले गरीब यांना सरकारला भ्रष्टाचारविरहित थेट मदत करणे शक्मय झाले आहे.

अशा परिस्थितीत कमीत कमी चांगल्या कामांची तरी पावती देण्याऐवजी काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी सल्ला देण्याच्या नावाखाली व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे पत्रकार परिषद घेऊन टीका केली आहे. ते म्हणाले, ‘देशात कोरोना संकटामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. याला आळा घालण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, लॉकडाऊन हा पर्याप्त उपाय नाही, लॉकडाऊन म्हणजे फक्त पॉज बटन आहे. लॉकडाऊनमुळे आता काही काळ संसर्ग थांबेल. पण लॉकडाऊन संपल्यावर कोरोना पुन्हा पसरेल. यासाठी सरकारला टेस्टिंगची क्षमता वाढवण्याची गरज आहे. आपल्याला कोरोना विरोधात शेवटपर्यंत लढायचे आहे. त्यामुळे या संकटाच्या काळात एकजूट दाखवण्याची गरज आहे. जात, धर्म, राजकीय मतभेद बाजूला ठेऊन आपण सर्व जण एकत्र लढलो तर आपण या संकटावर नक्की मात करू’

 वेळेत लॉकडाऊन केले नसते तर अमेरिकेपेक्षाही भारताची अवस्था वाईट झाली असती. टेस्टिंगची क्षमता वाढविण्यात आलीच आहे. जात धर्म, राजकारण बाजूला ठेवून एकत्र लढायला हवे असे राहुल गांधी म्हणतात आणि ज्या तबलिगी मरकत मुळे देशातील एक तृतीयांश कोरोनाबाधित वाढले, कदाचित हे झाले नसते तर कोरोनावर आपण विजय मिळवला असता, यावर मात्र एक चकार शब्द बोलत नाहीत. राहुल गांधींना कुणी फारसे गांभीर्याने घेत नसले तरी सोनिया गांधींबद्दल अजून तरी तसे नाही. पण त्यांनीही अनाहूत सल्ला दिला आहे. त्यांनी केंद्र सरकारला लिहिलेल्या आपल्या सूचनावजा पत्रात म्हटले आहे, ‘सरकारी जाहिराती, टीव्ही, वर्तमानपत्र व विविध ऑनलाईन जाहिराती दोन वर्षे बंद करून त्यातून वाचणारा पैसा हा कोरोनाविरुद्धच्या लढय़ासाठी उपयोगात आणावा.’

पण इतर सर्व व्यवसायांप्रमाणेच वृत्तपत्र व्यवसायही सध्या अतिशय कठीण परिस्थितीतून जात असताना त्याला मदत करण्याचे आवाहन करण्याचे सोडून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी मीडिया आणि वृत्तपत्रांना जाहिराती देणे कमी करून सरकारने आपला खर्च कमी करावा असा सल्ला दिला आहे. यात सोनिया गांधींचा सरकारचे पैसे वाचवून त्याचा गरिबांसाठी उपयोग व्हावा असा प्रामाणिक हेतू असला तरी काँग्रेस अध्यक्षांनी असा सल्ला मोदी सरकारला देणे म्हणजे सध्याच्या कठीण काळात सरकारी जाहिराती हा एकमेव महत्त्वाचा उत्पन्नाचा स्रोत असलेल्या वृत्तपत्रांचे कंबरडे मोडणारे ठरणार आहे. कदाचित मीडियावर मोदींना मिळणाऱया प्रसिद्धीवर अंकुश आणण्यासाठीही सोनिया गांधींनी ही सूचना केली असावी. पण याचा फटका मोदींपेक्षा वृत्तपत्रांना अधिक बसणार आहे, याचे भान त्यांना राहिले नाही. राज्यातील हॉट स्पॉट भागात भेट देण्यास केंद्रीय मंडळाला ममता बॅनर्जी सहकार्य करण्याऐवजी तपासणी करू देत नाहीत, भारतभर कोरोना पसरवणाऱया तबलिग जमातीच्या बातम्या वारंवार टीव्हीवर दाखवण्याला शरद पवारसाहेब आक्षेप घेतात, जमातवाल्यांनी कोरोनाचा प्रसार तर केलाच, पण डॉक्टर व पोलिसांवर हल्ले केले, नर्सेसबरोबर असभ्य वर्तन केल्यामुळे त्यांच्यावर सगळय़ांचाच रोष असला तरी सर्व मुस्लिम समाजाला कुणीही दोषी ठरवले नसताना याबद्दल ‘मुसलमानांना  दोषी धरू नये’ असे भडकाऊ वक्तव्य ओमर अब्दुल्ला यांनी केले आहे. या विरोधकांना झाले आहे तरी काय?

विलास पंढरी  – 9860613872

Related Stories

हस्तिदंती मनोऱयातील ‘कन्फ्युजन’

Patil_p

वंचितांचा आवाज गेला

Patil_p

विषय महात्म्य

Patil_p

गणेशोत्सवात हवे सार्वजनिक तारतम्य आणि आरोग्य भान

Amit Kulkarni

स्मर तव वैरी संभवला

Patil_p

पर्ससीन-पारंपरिक मच्छीमार संघर्ष वाढला!

Patil_p
error: Content is protected !!