तरुण भारत

सोलापुरात 13 नवीन कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळले – कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली 81 वर

तरुण भारत संवाद, प्रतिनिधी / सोलापूर

सोलापुरात कोरोनाबाधित आणखी 13 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 4 पुरुष, 9 महिलांचा समावेश आहे. सोलापुरात कोरोनाची संख्या 81 वर पोहोचली आहे. आजपर्यंत सहा जणांचा मृत्यू  झाला आहे. उर्वरित 75 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असल्याची. माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज बुधवारी दिली. आज आढळलेल्या रुग्णांपैकी लष्कर 3, सिद्धार्थ हौसिंग सोसायटी 1, इंदिरा नगर सोलापूर 3, आंबेडकर नगर माऊली चौक1, शामा नगर बिग बझार जवळ 1, मार्कंडे नगर कुमठा नाका 1, शनिवार पेठ पाच्छा पेठ 1, शास्त्रीनगर 1, ताई चौक एमआयडीसी 1 असे एकूण 13 नवीन कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.   आज एकूण  117 अहवाल प्राप्त झाले होते त्यापैकी 104 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले  तर उर्वरित 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

Advertisements

सोलापुरातील आयसोलेशन वार्डात 1624 व्यक्ती होते. त्यापैकी 1250 जणांचे अहवाल प्राप्त झाला असून, यापैकी 1169 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तर 374 व्यक्तीचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. एकूण  81 व्यक्ती पॉझिटिव्ह  आढळले आहेत. सोलापुरात नव्याने तीन कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यामुळे सोलापुरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

Related Stories

भुकेने मरण्यापेक्षा घरी जाऊन मेलो तर कुटुंबाला दर्शन होईल

Abhijeet Shinde

सोलापुरातील युवा चित्रकाराने अर्ध्या एकर शेतीमध्ये साकारली हरित गणरायाची प्रतिमा

Abhijeet Shinde

जिल्हा रुग्णालयातील दहा तर उपजिल्हा रुग्णालय कराड येथील सहा अनुमानितांचे रिपोट्र निगेटिव्ह

Abhijeet Shinde

कोल्हापूर : अखेर पाचगावमध्ये कोरोनाचा शिरकाव

Abhijeet Shinde

महाराष्ट्र : दैनंदिन कोरोना रुग्णांची नोंद घटली

Rohan_P

लाचखोरीत प्रशासनाचे खच्चीकरण नको

Patil_p
error: Content is protected !!