तरुण भारत

झूम-ओरॅकल एकत्र येण्याच्या तयारीत

वाढत्या ग्राहकांमुळे कंपनीचा निर्णय : झूमची ग्राहक संख्या 30 कोटीच्या घरात

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

देशात कोरोना विषाणूचा विळखा दिवसागणिक वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे जगासोबत देशातील विविध कंपन्या, शैक्षणिक संस्था यांनी आपल्या कर्मचाऱयांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. या कारणामुळे सध्या ऑनलाईन बैठका घेणे, विविध कार्यांचा आढावा घेणे, नवीन ध्येय धोरणे ठरविणे या गोष्टीसाठी 50 किंवा त्याहून अधिकजण एकत्रितपणे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करण्यात गुंतले असल्याचे पहावयास मिळत आहे. यात अशा सुविधा असणाऱया ऍपला मोठी पसंती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर झूम-ओरॅकल यांच्यात एक व्यवहार झाला असल्याचे झूमकडून देण्यात आलेल्या माहितीमधून समोर आले आहे.

आता अचानक हे दोघेजण एकत्र का आले आहेत, याबाबत स्पष्टीकरण देताना झूमने म्हटले आहे, की एकाच वेळी जवळपास 100 लोक व्हीडीओ स्वरुपात चर्चा करत असतात. याच कारणामुळे मोठय़ा प्रमाणात चर्चेचे ट्रफिक जॅम होत असल्याचे सांगितले आहे. या समस्येमुळे अनेकजण ओरॅकलचा वापर करत आहेत. यातून त्यांना ग्राहकांचा विश्वास जिंकण्यास मदत होणार आहे.

कोरोनाच्या संकटाला थोपविण्यासाठी विविध यंत्रणा हातात हात घालून काम करत आहेत. यामध्ये तंत्रज्ञानाच्या वापरावर जादा भर देण्यात येत आहे. याच काळात झूमच्या ग्राहक संख्येत मोठी वाढ होत असल्याने सर्व्हरला मर्यादा येत आहेत. ओरॅकल आणि झूम यांच्यात करार झाला आहे. डिसेंबरपर्यंत 1 कोटी ग्राहक होते तर त्यांची संख्या वधारुन 30 कोटींच्या घरात पोहोचली असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. 

झूम सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

मागील काही दिवसांपासून झूम ऍपच्या संदर्भात विविध उलटसुलट चर्चा होत आहे. यामुळे या ऍपच्या विश्वासाबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. तसेच दोघेजण संवाद करताना अन्य कोणीतरी हा सर्व्हर हॅक करण्याचा प्रकार निर्माण होण्याची भीती तज्ञांनी व्यक्त केली होती. यामुळे भारत सरकारने ऑनलाईन बैठका घेण्यासाठी या ऍपच्या वापराबाबत ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Related Stories

चहाचे उत्पादन घटणार

Patil_p

नवीन ग्राहक जोडण्यात ‘एअरटेल’ आघाडीवर

Patil_p

अर्थसंकल्पाच्या प्रक्रियेचे काम 16 पासून सुरू

Patil_p

शेवटच्या दिवशी सेन्सेक्समध्ये हलकीशी घसरण

Patil_p

मायक्रोसॉफ्टची टिकटॉकनंतर शेअर चॅटवरही नजर

Patil_p

प्राप्तीकर रिटर्न फॉर्म बिनचूक कसा भरावा?

Omkar B
error: Content is protected !!