तरुण भारत

मोटो जीपीच्या शर्यती रद्द

लंडन

 कोव्हिड-19 महामारीमुळे मोटो जीपीच्या जर्मनी, हॉलंड आणि फिनलँड येथे जून-जुलै दरम्यान होणाऱया शर्यती रद्द करण्याचा निर्णय स्पोर्टस् प्रो मोटार संघटनेच्या नियंत्रण मंडळाने जाहीर केला. मोटो जीपी प्रकारातील जर्मन ग्रां प्रि शर्यत 21 जूनला, हॉलंडमधील ग्रां प्रि शर्यत ऍसेन येथे 28 जूनला तर पहिल्यांदाच फिनलँडमध्ये आयोजित मोटो जीपी 12 जुलै रोजीची शर्यत कोरोना व्हायरस महामारीमुळे रद्द करण्यात आली आहे. 1949 पासून मोटो जीपीला प्रारंभ झाल्यानंतर प्रत्येक वर्षीच्या वेळापत्रकामध्ये हॉलंडमधील शर्यतीचा समावेश असतो. पण यावेळी कोरोनामुळे पूर्ण वेळापत्रक कोलमडण्याच्या मार्गावर असल्याचे प्रमुख कार्यकारी इपेलिटा यांनी सांगितले.

Advertisements

Related Stories

टोकियो पॅरा ऑलिंपिकमध्ये भारताकडून अधिक पदकांची आशा : दीपा मलिक

Patil_p

महिलांची टी-20 लिग स्पर्धा प्रोत्साहन देणारी ठरेल : कौर

Patil_p

शशांक मनोहर यांचा आयसीसी अध्यक्षपदाचा राजीनामा

Patil_p

‘आय ऍम बॅडमिंटन’ मोहिमेची पीव्ही सिंधू ‘ऍम्बॅसेडर’

Patil_p

‘हिटमॅन’ रोहितचे क्लासिक दीडशतक

Patil_p

मोहम्मद सिराजला पितृशोक, तरीही दौऱयात कायम राहणार

Patil_p
error: Content is protected !!