तरुण भारत

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कामे सुरू करण्यास परवानगी

प्रतिनिधी/ बेळगाव

लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्याने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरू असलेली सर्व विकासकामे बंद ठेवण्यात आली आहेत. महिन्याभरापासून ही कामे बंद असल्याने जैसे थे स्थिती निर्माण झाली होती. स्मार्ट सिटी योजनेतील कामे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून मध्यवर्ती शहर बसस्थानकाचे काम मार्गी लागले आहे.

Advertisements

कोरोना विषाणूचा प्रसार वाढल्याने संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे सर्वच कामे बंद ठेवण्यात आली आहेत. रस्त्यांचे काँक्रिटीकरण, बहुमजली व्यापारी संकुलांची उभारणी, स्मार्ट बसथांब्यांची उभारणी अशी विविध विकासकामे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत हाती घेण्यात आली होती. मात्र, लॉकडाऊनच्या घोषणेनंतर सर्व कामांना ब्रेक लागला आहे. स्मार्ट सिटीची कामे करण्यासाठी परप्रांतीय कामगार आणण्यात आले आहेत. सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे असल्याने काम बंद ठेवण्याची सूचना करण्यात आली होती.

बेळगाव जिल्हय़ात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने हॉटस्पॉट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे एक महिन्यापासून स्मार्ट सिटी योजनेतील सुरू असलेली कामे बंद ठेवावी लागली आहेत. सध्या काँग्रेस रोड, एसपीएम रोड, महात्मा फुले रोड, मंडोळी रोड, सावगाव रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, कॉलेज रोड, जुना पी. बी. रोड, येळ्ळूर रोड, अशोकनगर रोड, धर्मनाथ भवन ते रामदेव हॉटेलपर्यंतचा रोड, एपीएमसी रोड, महांतेशनगर परिसरातील अशा विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. सदर कामे अर्धवट स्थितीत असून ठिकठिकाणी रस्त्यांची खोदाई केली आहे. त्यामुळे मागील वर्षभरापासून वाहनधारकांची गैरसोय होत आहे. अशातच आता काम बंद झाल्याने कामे अर्धवट स्थितीत आहेत.

कला मंदिर येथे बहुमजली व्यापारी संकुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. मध्यवर्ती शहर बसस्थानकाच्या उभारणीचे काम सुरू असून या ठिकाणी शहर व मध्यवर्ती बसस्थानकाला जोडण्यासाठी भुयारी मार्गाचे कामदेखील सुरू करण्यात आले होते. पण लॉकडाऊनमुळे सर्वच कामांना ब्रेक लागला होता. सदर कामे सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हिरवा कंदील दर्शविला असून सामाजिक अंतर ठेवून व तोंडाला मास्क बांधून विकासकामे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे खानापूर रोडसह विविध ठिकाणी असलेल्या रस्त्यांचे काम सुरू करण्यात आले आहे.

Related Stories

लोकमान्य सोसायटीच्या मच्छे शाखेचे नव्या जागेत स्थलांतर

Patil_p

रामनगर येथे कोरोना योद्धय़ांचा सत्कार

Amit Kulkarni

‘मोफत औषध वितरण’ अभियानांतर्गत गरजुंना गोळय़ा-औषधांचे वाटप

Patil_p

बेळगावला सलग तिसऱया दिवशीही दिलासा

Patil_p

गुंजीत गटारी स्वच्छ : गाळ-कचरा रस्त्यावर

Amit Kulkarni

गणेशोत्सवाची मार्गसूची तातडीने जाहीर करा

Amit Kulkarni
error: Content is protected !!