तरुण भारत

बीए, बीकॉम, बीएससी तृतीय वर्ष परीक्षा घ्याव्यात

गोवा विद्यापीठाची सर्व महाविद्यालयांना सूचना

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

बीए, बीकॉम आणि बीएससीच्या तिसऱया वर्षाची परीक्षा सर्व कॉलेजांनी घ्यावी अशी सूचना गोवा विद्यापीठाने केली आहे. ऑनलाईन वर्गामार्फत शिकवणी करावी व अभ्यासक्रम संपवावा असेही कळवले आहे. तिसऱया वर्षाची परीक्षा म्हणजेच पेपर्स व तपासणी ही दोन्ही कामे दरवर्षी विद्यापीठातर्फे करण्यात येतात तथापि आता ती कामे कॉलेजनी करावीत अशा सूचना देण्यात आल्याचे विद्यापीठ सुत्रांनी सांगितले.

कॉलेजमध्ये अभ्यासक्रम कितपत पूर्ण झाला याची माहिती विद्यापीठास नाही. त्यामुळे जेवढा अभ्यासक्रम पूर्ण झाला असेल त्यावर आधारीत परीक्षा घेऊन मोकळे व्हावे. परीक्षेचे वेळापत्रक ठरवावे व निकालही करावा असे निर्देश विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व कॉलेजना देण्यात आल्याचे सूत्रांनी नमूद केले. विद्यापीठास तिसऱया वर्षाच्या परीक्षा घेणे अडचणीचे असून पेपर्स कॉलेजकडून विद्यापीठाकडे आणणे, त्यांची तपासणी करणे व सामाजिक अंतर पाळणे हे सर्व सध्याच्या लॉकडाऊनमध्ये शक्य नाही, असेही स्पष्ट केले आहे.

अभ्यासक्रम पूर्ण करण्यास अडचणी

राज्यातील सुमारे 33 कॉलेज गोवा विद्यापीठाशी संलग्न आहेत. कोरोनाचे लॉकडाऊन सुरू झाल्यावर ऑनलाईन शिकवणी करण्याची, घेण्याची सूचना विद्यापीठाने केली होती. परंतु ते सर्व कॉलेजना शक्य झाले नाही. इंटरनेट अडचणी, ऑनलाईन शिकवणीचा अभाव, अनुभव नसणे या कारणामुळे अनेक कॉलेजांचा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकलेला नाही. तो पूर्ण करण्यातही शिक्षकांना अडचणी येत आहेत. अनेकांचे शिकवणीचे साहित्य कॉलेजमध्येच अडकून पडले असून ते आणता येत नाही आणि त्याशिवाय ऑनलाईन शिकवणी घेता येत नाही अशी परीस्थिती आहे.

काही ठराविक विषयासाठी ऑनलाईन शिकवणी घेणे शक्य नाही. त्याकरीता प्रत्यक्ष शिकवणी आवश्यक आहे. अकाऊंटंसी सायन्स हे विषय ऑनलाईन करता येत नाहीत, असेही काही शिक्षकांनी सांगून त्यांच्या अडचणी नमूद केल्या आहेत.

Related Stories

भाजपचा एकही आमदार निवडून येणार नाही अशा प्रकारची परकाष्ठा भारतीय सुरक्षा मंच करणार- सुभाष वेलिंगकर

Amit Kulkarni

चिखलीतील जॉगर्स पार्कच्या दुसऱया टप्प्यातील विकासाची पायाभरणी

Amit Kulkarni

मडगाव पालिकेवर गोवा फॉरवर्ड-काँग्रेस निर्विवाद सत्ता

Amit Kulkarni

मुरगावात पालिका राजकारणात सत्ताधाऱयांकडून शासकीय यंत्रणेचा गैरवापर

Amit Kulkarni

फोंडा पालीकेचा अजब कारभार

Patil_p

योग्य आहार ही आरोग्यांची गुतवणूक

Amit Kulkarni
error: Content is protected !!