तरुण भारत

महामारीविरुद्ध रस्त्यावरची लढाई लढणारे पोलीस किती सुरक्षित?

प्रतिनिधी/ बेळगाव :

कोरोना महामारीविरुद्ध रस्त्यावरची लढाई लढणारे पोलीस किती सुरक्षित आहेत? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. कारण लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत बंदोबस्तावर राहणाऱया पोलिसांना कोरोनापासून स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी आवश्यक साहित्याचा पुरवठा झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisements

लॉकडाऊनच्या काळात पोलिसांना जवळपास दिवस-रात्र सतर्क राहावे लागत आहे. बेळगावातून कोणी बाहेर जाऊ नये, बाहेरून कोणी बेळगावात येऊ नये यासाठी गावच्या प्रवेशद्वारावरच पहारा देणाऱया या पहारेकऱयांना उत्तम दर्जाचे मास्क, पीपीई किटचा पुरवठा करण्यात आला नाही. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन काही समाजसेवी संघटनांनी या साहित्याचे वाटप केले आहे. नागरी पोलिसांबरोबर गृहरक्षक दलाचे जवानही कोरोना बंदोबस्तावर आहेत. त्यांची तर अवस्था पोलिसांपेक्षाही बिकट आहे.

दोन दिवसांपूर्वी राज्य राखीव दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोककुमार बेळगावला आले होते. राखीव दलाच्या पोलिसांची भेट घेऊन त्यांनी त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आरोग्याची विचारपूस करतानाच स्वतःच्या आरोग्याची जपणूक करत बंदोबस्त कसा करावा, याचा सल्ला त्यांनी दिला होता.

लॉकडाऊनच्या सुरुवातीपासून आजतागायत वेगवेगळय़ा संघटनांकडून वाटण्यात आलेले मास्क परिधान करून पोलीस रस्त्यावर उभे आहेत, असे आढळून आले आहे. कारण इतर खात्यात अशी परिस्थिती असेल तर त्वरित ते प्रतिकार करून आपल्याला न्याय मिळवून घेऊ शकतात. मात्र, पोलीस दलात याची मुभा नाही. कोणत्याही परिस्थितीत शिस्त ही पाळावीच लागते. म्हणून उघडपणे यासंबंधी कोणीच वाच्यता करत नाहीत.

हिरेबागेवाडी, कुडची परिसरात कोरोना रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. बेळगाव शहर व तालुक्मयातही रुग्ण आढळून आले आहेत. हॉटस्पॉटमध्ये दिवस-रात्र सेवा बजावतानाच कोरोनाग्रस्तांच्या घरी भेट देणे, सर्वेक्षण करणाऱया आशा, अंगणवाडी कार्यकर्त्यांना सुरक्षा पुरविणे, त्यांना मदत करण्याचे कामही पोलिसांना करावे लागते. असे असूनही त्यांच्या आरोग्याची मात्र काळजी घेतली जात नाही.

कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन 55 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या पोलिसांना कोरोना बंदोबस्तासाठी जुंपू नये, असा आदेश राज्य पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांनी दिला आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती लक्षात घेऊन कर्नाटकात हा आदेश देण्यात आला आहे. खासकरून मधुमेह, अति रक्तदाब, अस्थमा, श्वसनाचे विकार असणाऱयांना कोरोनाची लागण होण्याची शक्मयता अधिक असते. म्हणून 55 वर्षांहून अधिक वयाच्या पोलिसांना सुरक्षित ठिकाणी बंदोबस्तासाठी नेमण्याची सूचना देण्यात आली आहे.

दिवस-रात्र बंदोबस्त करताना सकस अन्नाबरोबरच कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आवश्यक साहित्याचा पुरवठा करणे गरजेचे असते. वेगवेगळय़ा संघटनांकडून नेहमी कार्यालयात ठाण मांडून बसणाऱया वरि÷ांची भेट घेऊन एन-95 मास्क वाटले जात आहेत. खरे तर त्याची गरज रस्त्यावर दिवस-रात्र उभे राहून बंदोबस्त करणाऱया पोलिसांना आहे.

Related Stories

खानापूर आगारातून अखेर बससेवेला सुरुवात

Patil_p

जिल्हय़ातील आणखी नऊ जण झाले कोरोनामुक्त

Patil_p

बेळगावातील 521 तपासणीच्या अहवालांची प्रतीक्षा

Rohan_P

निपाणी महाराष्ट्रात यावी हीच इच्छा

Patil_p

बुद्धिबळ स्पर्धेत अनिरूद्ध दासरी प्रथम

Amit Kulkarni

आरपीडी कॉलेजमध्ये भगतसिंग जयंती साजरी

Amit Kulkarni
error: Content is protected !!