तरुण भारत

कोरोना बाधित 3 रुग्ण बरे होऊण पोहचले घरी -वैदकीय अधिकारी डॉ. औदुंबर मस्के

प्रतिनिधी / सोलापुर

सोलापूरतील एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोना बाधित एक महिला व दोन मुलांवर यशस्वी उपचार केले. ते उपचारानंतर निगेटिव्ह आले. त्यामुळे तीन रुग्नांना आज, गुरुवारी दुपारी घरी सोडण्यात आल्याची माहिती सिव्हिल हॉस्पिटलमधील वैदकीय अधिकारी डॉ. औदुंबर मस्के यांनी गुरुवारी दिली.

गूरुवारी सायंकाळी 5 पर्यंत कोरोना बाधिताची संख्या 81 होती. तर आजपर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे सोलापूरकरांची चिंता वाढली होती. परंतू दुसरीकडे कोरोनाची बाधा झालेले 99 टक्के रुग्ण बरे होत असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी चार दिवसांपूर्वी दिली होती. हे 99 टक्के रुग्ण बरे होऊन लवकरच घरी पोहोचणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी सांगितले होते. त्यानूसार गुरुवारी दुपारी 1 महिला आणि 2 लहान मुलांना घरी सोडण्यात आले.

Related Stories

बारावीचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार

pradnya p

जेष्ठ खगोलशास्त्र शास्त्रज्ञ प्रा. डॉ. आर. व्ही. भोसले यांचे निधन

triratna

सोलापूर विद्यापीठातून कोरोना लसीचे संशोधन करण्यासाठी शास्त्रज्ञ तयार होतील : कुलगुरू

Shankar_P

जिल्हय़ात आता होम आयसोलेशन : 90 मुक्त

Patil_p

मॉर्निग वॉक करणाऱयांवर शहर पोलिसांकडून कारवाई

Omkar B

विक्रेत्यांनी टेस्ट करुन घ्यावी, अन्यथा परवाना रद्द : मनपा आयुक्त

Shankar_P
error: Content is protected !!