तरुण भारत

कोल्हापुरात कोरोनाचा पहिला बळी; इचलकरंजीच्या वृद्धाचा मृत्यू

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापुरात कोरोनाचा पहिला बळी गेला असून जिल्ह्याची चिंता वाढली आहे. इचलकरंजीतील 60 वर्षीय वृद्धाचा आज छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचारी रुग्णालयात मृत्यू झाला. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या चौघा नातेवाईकांवर इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Advertisements

गेल्या दहा दिवसांपूर्वी इचलकरंजीतील 60 वर्षीय वृद्ध कोरोनाची लक्षणे आढळल्याने इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात दाखल झाली होती. तेथे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवले होते. मिरज येथील प्रयोगशाळेतून रुग्णाचा अहवाल पऑजिटिव्ह आला होता. मधुमेहाचा त्रास असल्याने त्यानंतरच्या उपचारासाठी त्यांना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातील तीन दिवस त्यांची प्रकृती स्थिर होती. मात्र, त्यानंतर श्वास घेण्यात अधिक त्रास जाणवू लागला. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, त्यांच्याकडून उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही. अखेर आज सायंकाळी त्यांचा मृत्यू झाल्याचे सीपीआरमधील वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, इचलकरंजीत कोरोनाचा पहिला बळी गेल्याने वस्तनगरी हादरून गेली आहे.

Related Stories

मनपा पोटनिवडणुकीचा निकाल दुपारी 12 पर्यंत लागणार

Sumit Tambekar

अडचणी जाणून घेतल्या; आम्हाला मिळणार हक्क

Abhijeet Shinde

कोल्हापूर : टोप खणीचा सातबारा महापालिकेच्या नावावर !

Abhijeet Shinde

योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

datta jadhav

गगनबावडा कोरोना सेंटरमधील रुग्णांना साहित्य वाटप

Abhijeet Shinde

काश्मीरमध्ये नवीन दहशतवादी संघटना सक्रिय

datta jadhav
error: Content is protected !!