तरुण भारत

उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि….(सुवचने)

‘आळशाला दुप्पट काम’ आणि ‘कामावे ते सामावे’ ह्या दोन म्हणी आम्ही वडिलधाऱयांच्या तोंडून नेहमी ऐकत आलो. प्रत्यक्षात त्या किती खऱया आहेत ह्याचा अनुभवही घेतला! म्हणजेच आळशीपणा टाकून जर उद्योगीपणाची कास धरली तर त्यात मनुष्याचा फायदा असतो. ‘आळसे कार्य नासते’ असे समर्थ रामदासांनीही सांगितले आहेच. उद्योगीपणामुळे जगात मान मिळतो. उद्योगीपणाची महती सांगणारी अनेक सुभाषिते संस्कृतमध्ये आढळतात. उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः। न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगः।। अर्थः- उद्योगीपणामुळे अनेक कार्ये साध्य होतात, केवळ इच्छेने नव्हे. ज्याप्रमाणे झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिणे स्वतःहून प्रवेश करीत नाहीत. सिंहाला वनराज म्हणजे जंगलचा राजा म्हणतात. तरीही स्वतःला भूक लागली की, त्याला एखाद्या प्राण्याची किंवा हरणाची शिकार करावीच लागते. तो नुसता गुहेत बसून राहिला, तर कोणताही प्राणी ‘मला खा’ असे म्हणून त्याच्या तोंडात जायला तयार होत नाही. म्हणजेच स्वतःचे अन्न स्वतः मिळवावे लागते नि स्वतःच्या हातानी खावे लागते. दुसरे कोणी भरवायला येणार नाही. नुसती मनातल्या मनात इच्छा करून ते पुढय़ात येत नाही. नाहीतर ‘असेल माझा हरि, तर देईल खाटल्यावरी’ असे म्हणणाऱयांचा सर्वनाश ठरलेलाच! उद्यमः साहसं धैर्यं बुधिः शक्तिः पराक्रम:। षडेते यत्र वर्तन्ते तत्र देवः सहाय्यकृत्।। अर्थ:-उद्योगीपणा, साहस, धैर्य, बुद्धिमत्ता, शक्ती आणि पराक्रम हे सहा गुण ज्याच्या अंगी आहेत, त्यालाच देव सहाय्य करतो. वरील सहा गुणांमध्ये पहिलाच गुण उद्यम म्हणजे उद्योगीपणा सांगितला आहे. त्याच्या जोडीला इतर वरील गुण असतील, तर देवही त्याला मदत करतो. जो स्वतःला मदत करतो, त्यालाच देव मदत करतो. अगदी काही दिवसांपूर्वीचीच बातमी. वाशीम जिह्यातील एका जोडप्याने लॉकडाऊनच्या काळात काही काम नाही, म्हणून बसून न राहता एक अत्यंत मोठ्ठे काम चिकाटीने केले. कोणते माहीत आहे? तिथे पाण्याचा दुष्काळ आहे. पाण्यासाठी वणवण करावी लागते. तेव्हा त्या नवराबायकोनी 20-22 दिवस स्वतःच्याच दारात विहीर खोदण्याचे काम हाती घेतले. रोज थोडे थोडे खोदल्यावर पाणी लागले नि त्यांची पाण्यासाठीची वणवण कायमची थांबली. एकदा निश्चय केला, की कोणतेही अशक्मय काम उद्योगीपणामुळे शक्मय करता येते. तेव्हा आळस झटका नि कामाला लागा. फायदा तुमचाच आहे! आता थोडे संस्कृत संभाषण करूया? अम्बा (आई) :- अद्य शुक्रवासर:। (आज शुक्रवार आहे.) अद्य वयं सर्वे मंदिरं गच्छामः। आज आपण सर्वजण देवळात जाऊया. राधा:-अम्ब! श्वः रमायाः जन्मदिनम् अस्ति।(आई उद्या रमाचा जन्मदिवस आहे.) रमेशः:-तात! परश्वः भवान् कुत्र गमिष्यति? (बाबा! परवा तुम्ही कुठे जाणार आहात?)

Related Stories

त्यातें देखोनि विस्मित बाण

Patil_p

नागजंपीची गंमत

Patil_p

भारतीय सीमा म्हणजे काय आटय़ापाटय़ांचे चौकोन?

Patil_p

भूमिका आणि बहिष्कार

Patil_p

ड्रगमाफियांची पाळेमुळे उखडण्याची गरज

Patil_p

राम आले, रामराज्य कधी?

Patil_p
error: Content is protected !!