तरुण भारत

देशात 24 तासात 1 हजार 993 नवे कोरोना रुग्ण; 73 जणांचा मृत्यू

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :

देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. गेल्या 24 तासात कोरोनाच्या 1 हजार 993 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या 35 हजार 043 पोहचली आहे. गेल्या 24 तासात 73 रुग्णांनी आपला जीव गमावला असून एकूण मृतांचा आकडा 1 हजार 147 वर पोहचला आहे. आत्तापर्यंत 8 हजार 889 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव आणि प्रवक्ते लव अग्रवाल यांनी आज दिली.

Advertisements


ते म्हणाले, कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 25 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. गेल्या चोवीस तासात 553 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशातील प्रत्येक जिल्हा 3 झोनमध्ये विभागण्यात आला आहे. 


परराज्यातील लोकांना त्यांच्या घरी परत जाण्यासाठी विशेष ट्रेन सोडण्यास प्रत्येक राज्यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच आवश्यक ठिकाणी मास्क आणि सैनीटायजर पुरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले. 


एम्पॉवड ग्रुप 3 चे चेअरमन पी. डी. वाघेला म्हणाले की, सध्या आमच्याकडे 19 हजार 398 व्हेंटिलेटर उपलब्ध असून अजून 75 हजार व्हेंटिलेटरची गरज आहे. आम्हीं अजून 60 हजार 884 ट्वेंटी रिटर्न ची ऑर्डर दिली आहे. तसेच अजून दोन महिन्यांनी एक कोटी 40 लाख मास्क आमच्याकडे उपलब्ध असतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

Related Stories

चीनच्या ‘कुआईझाऊ-11’ चे लॉन्चिंग अयशस्वी

datta jadhav

आता ‘आयुष्यमान भारत’ योजनेअंतर्गत होणार कोरोनाचा उपचार

prashant_c

‘या’ तारखेपासून सुरू होणार राज्यातील महाविद्यालये

datta jadhav

पुंछमध्ये चकमक; दोन पोलिसांसह एक जवान जखमी

datta jadhav

आसाम रायफल्सने घेतला मणिपूर हल्ल्याचा बदला

datta jadhav

अहमदाबाद विमानतळावर ‘अस्वल’ तैनात

Patil_p
error: Content is protected !!