तरुण भारत

कोरोना योद्ध्यांसाठी सेना दलातर्फे उद्या रुग्णालयांवर होणार पुष्पवृष्टी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

संपूर्ण देशावर ओढवलेल्या कारोना महामारीच्या संकटात काम करणाऱ्या योद्ध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सेना दलातर्फे उद्या म्हणजे 3 मे रोजी देशात हवाई संचलने होणार असून, रुग्णालयांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे, अशी माहिती चीफ ऑफ डिफेन्स टॉपचे जनरल बिपिन रावत यांनी दिली. 

Advertisements

ते म्हणाले, कोविड -19 च्या लढ्यात लढणाऱ्या योद्ध्यांच्या स्मरणार्थ उद्या सायंकाळी श्रीनगर ते तिरुवनंतपुरम तसेच दिब्रुगड ते कच्छ अशा दोन हवाई मार्गांवरून हवाई संचलन करण्यात येणार आहे. यामध्ये हवाई दलाची फिक्स्ड विंग आणि लढाऊ विमान सहभाग घेणार आहेत.

तसेच चॉपर्स द्वारे कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर पुष्पवृष्टी केली जाईल. त्याचबरोबर आर्मी कडून प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयाजवळ माऊंटन बेन चे सादरीकरण केले जाणार आहे.

तसेच या लढ्यात सेनादल कायम या योद्ध्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Related Stories

20 सैनिकांच्या बलिदानाची जबाबदारी कोणाची? : जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

Rohan_P

लोजपच्या दोन्ही गटांना मिळाले नवे चिन्ह

Patil_p

PM मोदींना काळा झेंडा दाखवणाऱ्या काँग्रेसच्या महिला नेत्यावर गोळीबार

datta jadhav

खाद्यतेलाचे दर कमी करण्यासाठी केंद्राचे पाऊल

Patil_p

ग्रंथालयातून लोकशाहीवादी पुस्तके हटवा, हाँगकाँग प्रशासनाचे आदेश

datta jadhav

भाजपच्या आणखी एका आमदाराचा तृणमूलमध्ये प्रवेश

Patil_p
error: Content is protected !!