तरुण भारत

कडेगाव तालुक्यात कर्तव्यदक्ष पोलिसिंगमुळे कोरोना हद्दपारीच्या उंबरठ्यावर

कडेगाव/प्रतिनिधी


कडेगाव तालुक्यात कडेगाव पोलिसांच्या आदर्शवत, कर्तबगार पोलिसिंगमुळे कोरोनो हददपारीच्या उंबरठ्यावर तालुक्यात सध्या एकही कोरोनो बाधित रूग्ण नाही. येतगावातील एकजण कराड तालुक्यात बाधित झाला आहे अशी आजची परीस्थिती कडेगाव तालुक्यातील आहे.
एकंदरीत कडेगाव तालुक्यात कडेगाव पोलिसांनी गेली महिनाभरात दिवसरात्र जागता पाहरा ठेवण्यात आली आहे. त्यांनी वळोवेळी लोकांना वेळप्रसंगी गोडीगुलाबीने तर कधी सौम्य शिक्षा करून आणि वेळप्रसंगी कायदा व प्रशासन यांच्या नियमाने नागरीकांना सोशल डिस्टीसिंग पाळण्यासठी भाग पाडले यामुळे कडेगाव तालुक्यातील जे कायम स्वरूपी स्थानिक असणाऱ्या लोकांना कोरोनाची लागण झाली नाही. मात्र कडेगाव तालुक्यातील जे नागरीक बाहेरून आले. त्यांनाच कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. जे नागरीक परदेशातून आले त्यांच्या कडून तालुक्यातील कोणत्याही लोकांना प्रादुर्भाव झाला नाही. त्यांना ही पंधरा दिवस विलिगीकरण कक्षात ठेवण्यात आले. त्यांना कोणत्याही प्रकारची बाधा झाली नाही. त्यातून तालुक्याची सहिलामत सुटका झाली मात्र इतर राज्यातून आलेल्या लोकांच्या मुळे संशयाचे वातावरणात मात्र ते ही निवळले.

Advertisements

खेराडे वांगी येथील मृत व्यक्ती मुळे तालुक्यातील पोलिस, महसूल व आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांची पळापळ झाली. या मृत व्यक्तीच्या दहन विधीस उपलब्ध असलेल्या लोकांना सध्या कडेगाव येथील विलगीकरण कक्षात ठेवलेले आहे. ठराविक दिवसानंतर त्यांची तपासणी होवून त्यांना सोडण्यात येईल. मात्र सायन हाँस्पीटल यांच्या डिन कडून कोणत्याही प्रकारच्या लेखी अजून देण्यात आले नाही.यामुळे खेराडे वांगी घटनेबाबत संशयाचे वातावरण आहे. कडेगाव तालुक्यात कराड,विटा,पुसेसावळी,पाचवामैल व इतर सर्व तालुक्यातील सिमा दुसऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना पुर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. कडेगाव तालुक्यात कडेगाव पोलिसांच्याकडे १ वरीष्ठ पोलिस निरीक्षक, १ पोलिस निरीक्षक, १ पोलिस उप निरीक्षक, ३४ पोलीस कर्मचारी,२२ होमगार्ड,४ पोलिस मित्र १४ माजी सैनिक कर्तव्यावर काम करीत आहेत.

Related Stories

सांगली : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या विशेष मोहिमेचा लाभ घ्या – संभाजी पोवार

Abhijeet Shinde

कल्याणकारी महामंडळ गतीमान करा

Abhijeet Shinde

नांदेडमध्ये खलिस्तान समर्थकाला अटक

datta jadhav

मणेराजूरीच्या इतिहासकालीन “कलावंतीणचे कोडे” जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट !

Sumit Tambekar

लोकमान्य मल्टीपर्पजच्या आरोग्य शिबिराला प्रतिसाद

Abhijeet Shinde

निवड चाचणी ठरणार महाराष्ट्र केसरीची रंगीत तालीम!

datta jadhav
error: Content is protected !!