तरुण भारत

चालू ट्रॅक्टर मधून पडल्याने एकाचा मृत्यू

प्रतिनिधी / वारणानगर

बोरपाडळे ता. पन्हाळा येथील गायरानातील उत्खनन केलेला मुरुम ट्रॅक्टर ट्रॉलीतून आणताना डोंगरावरील उतारावरून ट्रॅक्टरवरील ताबा सुटून खाली पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. विक्रम गणपती जकाते वय ३५ रा. मराठी शाळेजवळ, बोरपाडळे असे त्याचे नाव आहे. बोरपाडळे येथील शासकीय गायरान डोंगर उतारावर आहे. आवटी यांच्या घरामागे केलेल्या उत्खनातील मुरूम विक्रम जकाते यांनी आपल्या ट्रॉलीत भरून ट्रॅक्टरने कच्या रस्त्याने परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत निष्काळजीपणे भरधाव वेगाने घेवून येत होते गट न.३३७ मधील हद्दीत आलेवर विक्रम चालू टॅक्टर मधून खाली पडून बेशुध्द पडला असता त्याच्या कानातून, नाका, तोडांतून रक्त येत होते.

Advertisements

तातडीने त्यास उपचारासाठी कोडोली उपजिल्हा रुग्णालयात आणलेवर डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे घोषीत केले. शहापूरचे पोलीस पाटील सागर चंद्रकांत कडवेकर यांनी या अपघाताची वर्दी दिली असून हावलदार घोरपडे, तपास करीत असून या अपघात प्रकरणी मृत विक्रम जकाते यांच्यावरच पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

Related Stories

बर्ड फ्लू ची धास्ती कायम

Patil_p

कोल्हापूर : पन्हाळ्याचे सहायक फौजदार लाचलुचपतच्या जाळ्यात

triratna

आता नवा वसूली मंत्री कोण?, चित्रा वाघ यांचा सवाल

Rohan_P

करुणा शर्मा यांच्या न्यायालयीन कोठडी वाढ

triratna

पालघर : घराला लागेल्या आगीत एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

triratna

”कोरोना युद्ध जिंकण्याच्या नावाखाली पीएम मोदींनी ऑक्सीजन, आईसीयू बेडची संख्या घटवली”

triratna
error: Content is protected !!