तरुण भारत

कामगार दिनी टोल कर्मचारी पगारासाठी संपावर

वार्ताहर/ आनेवाडी

टोल नाका म्हणजे वादा वादी भांडण हे नित्य नियमांचे झाले आहे,शासनासाठी टोल वसूली करायची त्यामुळे स्थानिक टोल व्यस्थापन अनेक वेळा गैर मार्गाने वाहन चालकांशी हुज्जत घालून वसूली करतात, मात्र टोल वर काम करणाया कर्मचायांना अश्या वेळी पोलिस स्टेशन कोर्टाचे हेलपाटे मारावे लागतात अश्या वेळी त्यांच्या पाठीशी ना रिलायन्स उभी असते ना स्थानिक टोल व्यवस्थापन त्यामुळे त्यांचा त्रास कर्मचारी भोगत असतो अश्यताच कोरोना मुळे लॉक डाउन ची परिस्थिति उदभवल्याने कर्मचारी यांच्या वर पगार न मिळाल्याने उपासमारीची वेळ आली आहे

Advertisements

          आनेवाडी टोल नाक्यावरील अशोका स्थापत्य नावाच्या स्थानिक टोल व्यस्थापनाच्या कड़े टोल वसूलीचे काम असून,त्यांच्या कड़े मोठय़ा संख्येने स्थानिक युवक काम करीत आहेत,परंतु अनेकदा या कर्मचायांना पगारा विना काम करण्याची वेळ आली आहे,मात्र कोरोना मुळे काही दिवस केंद्र सरकारने टोल वसूली बंद ठेवली होती,पुन्हा एकदा शासनाच्या आदेशानुसार टोल वसूली चालू झाली त्यावेळी सर्व कर्मचारी यांची सुरक्षा बाबत काळजी घेवूनच टोल घेण्याचे आदेश असताना या कर्मचारी यांना मास्क,हैंड ग्लोवज,सॅनीटायझर,या वस्तु वेळेवर मिळाल्या नाहीत त्यामुळे सध्या त्यांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्न चिन्ह असून त्यामुळे मुंबई पुणे कडून होणाया वाहतूकी मुळी कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता बळावली आहे,स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाया या कर्मचायांचा गेल्या दोन महिन्यापासून पगार झाला नसल्याचे काही कर्मचारी यांनी सांगितले

        सर्वच ठिकाणी लॉक डाउन मुळे नोकरी व्यवसाय बंद आहेत या काळात पगारा अभावी घर कुटुंब चालविताना टोल कर्मचारी यांना तारे वरची कसरत करावी लागत आहे,याच काळात जर त्यांच्या कुटुंबात वैद्यकीय सेवेची गरज भासल्यास त्यांच्या कड़े आर्थिक तरतूद नसल्याने मोठे संकट त्यांच्या वर येवू शकते.स्थानिक टोल व्यवस्थापन मात्र एसी,फॅन खाली बसून घरी आराम करत आहेत,टोल कर्मचारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोणत्याही सोई सुविधे शिवाय काम करीत आहेत,रिलायन्स कंपनी च्या आनेवाडी येथील व्यस्थापकाना या बाबत विचारणा करण्यात आली असता त्यांनी स्थानिक टोल व्यस्थापनाच्या कारभारावर बोलण्यास नकार दिला          एक मे कामगार दिनाच्या दिवशी पगारा पोटी कामगाराना संपावर जावे लागते ही टोल व्यस्थापनासाठी लाजिर वाणी बाब असून,जिल्हाधिकारी यांनी यामधे लक्ष घालून न्याय मिळवून देण्याची मागणी टोल कर्मचारी करीत आहेत,स्थानिक कर्मचारी कामावर न आल्याने रिलायन्स कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतः टोल बूथ वर बसून टोल वसूली केली,शुक्रवार सकाळी आनेवाडी ते वीरमाड़े दिशेने जवळपास एक किलोमीटर च्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या,अचानक आलेली ही वेळ कमी वहानांच्या संख्येमुळे निभावुन गेली मात्र टोल कर्मचारी यांचे पगार होणार तरी कधी याची प्रतीक्षा कर्मचायांना लागूंन राहिली आहे

Related Stories

सरकारने तत्काळ अधिवेशन बोलवावे

Patil_p

हद्दवाढ क्षेत्रातील बांधकाम परवान्यात अडचण

Patil_p

सातारा : बारा नागरिकांना आज डिस्चार्ज

Abhijeet Shinde

सैन्य भरती घोळयातील पोलीस अधिकाऱयांना बडतर्फ करा

Patil_p

गणेशोत्सव साहित्य खरेदीत ‘मेड इन इंडिया’ला अधिक पसंती

Patil_p

हुमणीचे एकात्मिक नियंत्रण अल्पखर्चिक आणि प्रभावी

Patil_p
error: Content is protected !!