तरुण भारत

अडचणीवर मात करून कामे पूर्ण करण्याचे ठेकेदारापुढे आव्हान.

वार्ताहर/ औंध

    शासनाने मार्गदर्शक नियम घालून शिथीलता दिल्याने लाँकडाऊन मध्ये बंद झालेली रस्त्याची कामे पुन्हा सुरू झाली आहेत. मात्र सोलापूर रेड झोन मध्ये असल्याने सिमेंटचा प्रश्न निर्माण झाला आहे. अडचणीवर मात करून कामे पूर्ण करण्याचे ठेकेदारापुढे आव्हान आहे.

Advertisements

         सम्रुध्दी महामार्ग योजनेअंतर्गत जिह्यातील  प्रमुख राज्यमार्गाची कामे गतीने सुरू होती. तसेच जिल्हा परिषद बांधकाम आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील मार्च महिना डोळ्यासमोर ठेवून, रस्ते पूल साकव आदीची कामे वेगाने सुरू केली होती. परंतु कोरोनाच्या महामारीमुळे रोगाचा फैलाव होऊ नये यासाठी लाँकडाऊन जाहीर करण्यात आल्याने कामे ठप्प झाली होती. परंतु पावसाळा तोंडावर असताना काही अत्यावश्यक पुलाची रस्त्याची कामे पूर्ण झाली नसती तर पावसाळ्यात वाहतूकीची आणखी समस्या निर्माण झाली असती. यामुळे शासनाने काही अत्यावश्यक कामे पावसाळ्या पूर्वी पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शक सुचना देऊन शिथीलता दिली होती. त्यामुळे ठेकेदारांनी ही कामे सध्या सुरू केली आहेत.

   कामे सुरू झाली असली तरी सध्या ठेकेदारापुढे नवीन समस्या निर्माण झाली आहे. सोलापूर सध्या रेड झोनमध्ये आहे. आणि ब्रयापैकी सिमेंटचा पुरवठा सोलापूर मधून होतो. सध्या तरी सर्वत्र सिमेंटची टंचाई निर्माण झाली आहे. शिवाय मोठय़ा ठेकेदाराकडे अनेक परप्रांतीय मजूर कामाला आहेत. शासनाने आता परप्रांतीय मजूरांनाही आपापल्या घरी जाण्याची परवानगी दिल्याने या मजूरांना घरी जाण्याचे वेध लागले आहेत. पावसाळा तोंडावर आला आहे. सिमेंटचा तुटवडा त्यातच मजुरांची घरी जाण्यासाठी लगबग यामुळे कामे कशी पूर्ण करायची याचे कोडे ठेकेदारांना पडले आहे.

  कोरोनाच्या संकटामुळे मधल्या काळात बंद असलेल्या कामे पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. मार्गदर्शक सुचनांचे पालन करून रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही याची खबरदारी घेऊन ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करुन घेण्याचा आमचा प्रयत्न राहील.

 

Related Stories

अनिल देशमुखांना आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

datta jadhav

गँगस्टर अरुण गवळीच्या मुलीचे अभिनेता अक्षय वाघमारे सोबत उद्या होणार लग्न

Abhijeet Shinde

”राज्यातील युवा, शेतकरी, कलाकार आत्महत्येच्या वाटेवर, सरकार बिल्डरांना सवलती देण्यात व्यस्त”

Abhijeet Shinde

जिल्हा बँकेचे व्यवस्थापक रणवीर चव्हाण यांचे अपघाती निधन

tarunbharat

मौत से आँख मिलाने की जरुरत क्या है

Patil_p

अजित पवार हसले, आणि म्हणाले…

Rohan_P
error: Content is protected !!