तरुण भारत

मंत्री शंभूराज देसाईंची दुचाकीवरून शहरात रपेट

प्रतिनिधी/ सातारा

राज्याचे गृहमंत्री शंभूराज देसाई हे पायाला भिंगरी लावून जनतेसाठी धावत आहेत. आपल्या पाटण विधानसभा मतदारसंघासह ते ज्या जिह्याचे पालकमंत्री आहेत. त्या वाशीम जिह्यासह सर्वच ठिकाणी यंत्रणेला वारंवार सूचना देत आहेत. सातारा शहर लॉकडाऊन केल्यानंतर त्यांनी स्वतः त्यांच्या त्याच दुचाकीवरून शहरात रपेट मारून पोलीस आणि पालिका कर्मचाऱयांना बळ दिले. सातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्याकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱया उपाययोजना जाणून घेत त्यांना सूचना दिल्या. खास करून कंनटेंटमेंट झोनचा त्यांनी लेखाजोखा घेतला. शहराच्या पाणी पुरवठय़ाची चौकशी केली. त्यामुळे मंत्री असावा तर असाच असा सूर उमटत होता.

Advertisements

  गतवर्षी महापुराचा फटका मंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण मतदारसंघाला बसला होता. मतदारसंघातल्या जनतेसाठी भर पावसात अगदी तांबव्यापासून कोयनेच्या खोऱयात कधी त्यांची 7070 धाव घेत होती. ओढय़ाना आलेल्या पुराच्या पाण्याखाली साकव गेले होते. दळणवळण ठप्प झाले होते तरी हे त्यावेळी जनतेची दुःख हलके करण्यासाठी त्यांना मदत देण्याकरिता पोहचत होते. अगदी मोरगिरी, कुसरुंड भागापासून ते तारळी खोरे, चाफळ खोऱयात मंत्री शंभूराज देसाई पोहचले होते. आता ही कोरोनाचा कहर बघता बघता गावच्या वेशीवर पोहचला. त्यांच्या पाटण विधानसभा मतदारसंघात डेरवण येथे ही आला. पण मंत्री या नात्याने त्यांनी स्वतः जनतेच्या हिताकरता पायाला भिंगरी लावत मतदारसंघाच्या आरोग्य यंत्रणेला आणि पोलिसांना सतत पाठबळ देत राहिले. मतदार संघातील जनतेलाही त्यांनी आधार देण्याचे सातत्याने काम करत आहेत. वाशीमचे पालकमंत्री या नात्याने तेथेही कोरोनामुक्त जिल्हा कसा राहिल याकरता त्यांचे सतत लक्ष आहे. तेथील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना ते वारंवार सूचना करत आहेत. त्यामुळे वाशिममध्ये कोरोनाच्या मुसक्या आवळण्यात यश येत आहे.

 खरीप हंगाम आढावा बैठक ही त्यांनी ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली. राज्याचे ग्रामीण गृहमंत्री या नात्याने त्यांची राज्याच्या पोलीस दलाचे मनोबल वाढविण्यासाठी सातत्याने सूचित करत आहेत. घडणाऱया घटनांमध्ये तत्काळ आदेश देऊन निपटारा करत आहेत.

सायंकाळी 6.30 वाजता पालिकेच्या दारात मंत्र्यांची दुचाकी

नुकताच दोन दिवसांपूर्वी सदरबझार परिसरात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. त्यामुळे प्रशासनाने सातारा शहर लॉकडाऊन केले आहे. या लॉकडाऊनमध्ये पालिका प्रशासनाने नेमकी काय उपाययोजना केली आहे?, याचा आढावा घेण्यासाठी एक मंत्री असून कोणतीही सुरक्षा न घेता सोशल डिस्टन्स पाळत त्यांची कॉलेजच्या काळातील दुचाकी पुन्हा बाहेर काढून सायकांळी साडे वाजता पालिका गाठली. सातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे हे बाहेर पडतच असताना प्रवेशद्वारातच त्यांनी त्यांच्याकडून आढावा जाणून घेत त्यांना सूचना दिल्या. शहराला पाणी पुरवठा व्यवस्थित होतो की नाही, काही अडचण नाही ना, हे ही त्यांनी जाणून घेत त्यांनी कंटेंटमेंट झोन आणि बफर झोनमध्ये काय काय करता?, नागरिकांची सुरक्षितता महत्वाची आहे, अशा ही सूचना त्यांनी दिल्या आहेत. मंत्री देसाई यांनी लावलेली भिरकीट पाहून मंत्री असावा तर असाच, अगदी लोकनेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारा, त्यांच्यासाठी धडपडणारे आहेत, हे पाहून जिह्यातील जुन्या मंडळींना लोकनेते बाळासाहेब देसाई यांचीच आठवण आल्याशिवाय राहत नाही, अशी जुन्या जाणत्या मंडळींमध्ये आहे चर्चा आहे.

Related Stories

कोल्हापूर जिल्हय़ात नवे 17 पॉझिटिव्ह

triratna

चंद्रकांत पाटील यांना विश्रांतीची गरज

Patil_p

मराठा समाज महाविकास आघाडीला माफ करणार नाही : चंद्रकांत पाटील

Shankar_P

सांगली : शिराळ्यात ७५ ते १०० बेडची व्यवस्था करा : जिल्हाधिकारी चौधरी

triratna

इचलकरंजीत आज ६ जण कोरोना पॉझिटिव्ह

triratna

सोलापुरात नवीन तीन कोरोनाबाधित रुग्णांची भर, बाधितसंख्या 114 वर

triratna
error: Content is protected !!