तरुण भारत

वेबची दुनिया कल्पकतेला पूरक : सचिन दरेकर

 लेखक, पटकथाकार आणि दिग्दर्शक अश्या तीन भूमिका एकटा सांभाळणारा सचिन दरेकर याने नुकतेच एम एक्स प्लेयरची निमिर्ती असलेली एक थी बेगम या वेबसिरीज द्वारे वेब दुनियेत पदार्पण केले आहे. लेखक म्हणून गेली अनेक वर्ष चित्रपट आणि मालिका क्षेत्रात कार्यरत असलेला सचिन ने पार्टी या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले होते. आता एक वेगळ्या विश्वात जिथे कोणतीही बंधन नाहीत अशा वेबदुनियेच्या सचिनचा अनुभव जाणून घेतला आहे.

चित्रपट मालिका करताना आपल्याला काहीशी बंधन असतात आणि ती बंधने क्वचितपणे आपल्या कल्पक बुद्धिमतेला मारक ठरतात. अशावेळी वेब माध्यम मात्र आपल्याला सगळी बंधने झिडकारून लावायला सांगते. आपल्याला वेबवर मोठय़ा प्रमाणात प्रेक्षक वर्ग मिळतो त्याच बरोबर वेबदुनियेत नवनवीन प्रयोग करण्याला कधीच बंधन येणार नाही. इथे काम करण्याचा अनुभव हा एक कल्पकतेला पूरक असा असून वेबवर अजून काम करायचे आहे. मी लेखक म्हणून जेव्हा सुरुवात केली त्यावेळी मला माहिती नव्हत की मी पुढे जाऊन चित्रपट किंवा वेबसिरीज दिग्दर्शित करेन, तस काही ठरवलं सुद्धा नव्हतं. अनेक चित्रपट आणि मालिका केल्यानंतर जो आत्मविश्वास आला त्यातून मी दिग्दर्शनाची सूत्र हातात घेऊ शकतो हे मला कळलं. ष्पार्टीष् हा चित्रपट मी दिग्दर्शित केला कारण ती कथा मला जवळची वाटली आणि त्यात एक शिकवण सुद्धा होती. आता एक थी बेगमष् म्हणजे एक स्त्राr आपला सूड पूर्ण करण्यासाठी काय करू शकते आणि सगळ्या हद्दपार करून ती काय करेल याच चित्रण मी केलंय. सत्य घटनेवरून प्रेरित असलेली ही कथा एक वेगळा दृष्टीकोन सुद्धा अनेकांना देऊ शकते. असे सचिन दरेकरने सांगितले. बेगमसाठी पहिली पसंती ही अनुजाच होती. जेव्हा एम एक्स प्लेयर सोबत आम्ही ही वेबसिरिज करण्याचे ठरवले तेव्हा काही नाव आम्हाला सुचवली गेली. बेगम साकारेल तर अनुजाच अस सगळ्यांचं एकमत झालं होतं. अनुजा गुणी, प्रामाणिक आणि प्रयोगशील अभिनेत्री असून तिचा अभिनय हा कमालीचा आहे. अनुजा कथा ऐकताच बेगम साकारायला तयार झाली. तिचा हाच उत्साह या भूमिकेसाठी आवश्यक होता. या आधी अनुजा आणि मी असा मी अशी ती हा चित्रपट, लगोरी मैत्री रिटर्न्स या मालिकेसाठी एकत्र काम केलं आहे.  त्यानंतर तिने इरफान खान आणि जॉन अब्राहम सोबत चित्रपट केले. तिला भेटण्या अगोदर मी साशंक होतो की ती तशीच आधीची अनुजा असेल का जिला मी आधी भेटलो होतो. पहिल्यांदा भेटल्यावरच माझी शंका दूर झाली, ती तशीच होती उत्साही आणि कामाच्या प्रति स्वत:ला झोकून देणारी. ती मुख्य भूमिकेत असल्यामुळे ती सतत सेटवर असायची. सुरुवातीपासून ते शूट संपेपर्यंत तिचा उत्साह हा उत्स्फूर्त होता. अगदी पहाटे 4.30 च्या शूटला सुद्धा तिचा तोच उत्साह असायचा. असे सचिनने सांगितले. संतोष, अभिजित,अमितराज, चिन्मय, विजय निकम, राजेंद्र,अजय गेही, अंकित मोहन हे सगळेच माझे मित्र असून त्यांच्या साथीने ही वेबसिरिज बनवताना फार मज्जा आली. प्रत्येक अभिनेत्याने  त्याच पात्र हे अगदी जिवंत केले असून वेबसिरिज त्यामुळे अधिक अंगावर रोमांच उभे करते. ही पात्र बेगम इतकीच महत्त्वाची आहेत कारण बेगमच्या या प्रवासात ती सगळीच कुठे ना कुठे बेगमला साथ देत आहेत किंवा बेगमच्या आणि तिच्या ध्येयाच्या मध्ये येत आहेत. अश्रफ म्हणजेच सपनाचे पात्र हे फार ताकदीचे आहे आणि त्याच ताकदीला जुळतं असं पात्र म्हणजे मकसूद. मकसूद आणि अश्रफ यांची पात्र खुलली त्याला कारण म्हणजे सहयोगी पात्र त्यामुळे दोन महत्वाची पात्र उभी राहू शकली. असे सचिनने सांगितले.

Advertisements

Related Stories

विवाह अन् मुले दोन्ही आवश्यक

Amit Kulkarni

नक्षलबारी वेबसीरीज ठरतेय हीट

Patil_p

सर्वात मोठय़ा खासगी बेटाचा होणार लिलाव

Amit Kulkarni

अल्लू अर्जुनसोबत पुन्हा झळकणार रश्मिका

Amit Kulkarni

‘डेथ ऑन द नाइल’चे पोस्टर प्रसारित

Patil_p

‘वागले की दुनिया’च्या कलाकारांची शूटिंगनंतर धमाल

Patil_p
error: Content is protected !!