तरुण भारत

गुटखा जोमात गाव कोमात

वार्ताहर / कुंभोज

कुंभोज तालुका हातकणंगले येथे संचारबंदी मुळे गाव कोमात असताना गुटखा मात्र जोमात चालत आहे. परिणामी दुप्पट दराने गुटखा व मावाची विक्री होत असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत असून, काही गुटखा विक्रेते एजंट व काही पानपट्टीवाला,दुकानदार आपल्या घरातून सदर व्यवसाय करत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी सदर घटनेकडे हातकणंगले पोलिसांचे सदर गोष्टीकडे असणारे जाणीवपूर्वक दुर्लक्ष , कुंभोज बाहुबली हिंगणगाव दानोळी रोड येथे काही किरकोळ विक्रेत्यांच्या दुकानावर धाडी पडल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी याबाबत कोणताही प्रकारचा गुन्हा पोलिसात नोंद नसल्याचे पाहावयास मिळत आहे.

Advertisements

गेल्या दोन महिन्यापासून संपूर्ण देशात संचारबंदी व जिल्हा बंदीचे आदेश असतानाही तसेच सर्व व्यवसाय बंद असूनही कुंभोज व परिसरात कर्नाटक राज्यातून पहाटे व रात्रीच्या सुमारास मोठ्याप्रमाणात गुटख्याची वाहतूक होत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी सदर व्यवसाय करणारे व्यवसायिक सदर गुटकाची डबल दराने विक्री करत असून नागरिक व्यसना पोटी सांगेल त्या दराने ते खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत, तंबाखूच्या पाच रुपये च्या पुढचा दर सध्या 35 रुपये झाला असून परिणामी संपूर्ण देशात दोन महिने लॉक डवून असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक व विक्री होते. व याकडे शासनाचे असणारे दुर्लक्ष, गुटका व्यवसायाला मिळणारा नागरिकांचा प्रतिसाद पाहता संचारबंदी चे जाणीवपूर्वक उल्लंघन करत असल्याचे चित्र दिसत आहे.

परिणामी एसटी स्टँड परिसर, बाजारपेठ मसुदी कट्टा आदी परिसरात सध्या गुटखा चोक या नावाचे साम्राज्य पसरले असून खवय्ये मात्र लागेल तो प्रयत्न करून तो मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत परिणामी याबाबत काहि लोकप्रतिनिधींशी चर्चा केली असता सदर गोष्ट सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याची व मागणीचे असून बऱ्याच वेळा विक्रेत्यांना व व्यापाऱ्यांना सदर गुटका न विकण्याचे सूचना करूनही याची अंमलबजावणी केली जात नसल्याचे चित्र दिसत असल्याचे मत काही लोकप्रतिनिधींनी बोलताना व्यक्त केले आहे.परिणामी याबाबत हातकणगले पोलिस स्टेशनची असणारी उदासीनता, उत्पादन शुल्क अधिकार्‍यांचे असणारे निष्क्रिय धोरण व विक्रेत्यांना मिळणारा संधीचा फायदा यामुळे संचार बंदीच्या काळात सर्वसामान्य नागरिक कोमात आणि गुटका मात्र जोमात अशी अवस्था कुंभोज परिसरात निर्माण झाली आहे.

Related Stories

कोडोलीत महालोक अदालत, ३० व्यक्तींनी केला गुन्हा कबुल

Abhijeet Shinde

Anil Deshmukh case : भाजपकडून एजन्सीचा गैरवापर – सुप्रिया सुळे

Abhijeet Shinde

धोकादायक : महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्या 22,818 वर

Rohan_P

सातारा : तालुकास्तरावर कोरोना केअर सेंटर सुरू करणार : जिल्हाधिकारी सिंह

Abhijeet Shinde

कोल्हापूर : सेनापती कापशीतील ‘कापशी बझार’ला आग

Abhijeet Shinde

कोल्हापूर : आमचे आंदोलन शासनाला भीमटोला असेल!

Abhijeet Shinde
error: Content is protected !!