तरुण भारत

तांबवे दंडभाग परिसरात ट्रॅक्टर चालकास लुटमारीचा प्रयत्न

प्रतिनिधी / इस्लामपूर

वाळवा तालुक्यातील तांबवे येथील दंडभाग परिसरात तिघांनी चाकूसारख्या धारदार शस्त्राचा धाक दाखवून तिघांनी एका ट्रॅक्टर चालकास लुटमारीचा प्रयत्न केला. पाठीमागून दुसरा ट्रॅक्टर आल्याने त्यांचा डाव फसला. त्यातील एकास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यासह अन्य दोघांना कासेगाव पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

Advertisements

अविनाश नारायण शिंदे(२४), अभिजीत सर्जेराव चव्हाण (२४), महेश बाजीराव गावडे(२३) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. यातील शिंदे हा रात्रीच हाती लागला. तर अन्य दोघांना सोमवारी ताब्यात घेण्यात आले.

लखन शशिकांत रजपूत(२८,रा. की.म.गड)हा ट्रॅक्टर घेवून तांबवेकडे चालला होता.कृष्णा नदीवरल बहे पूल ओलांडून हा ट्रॅक्टर दीड किलोमीटर अंतरावर येवलेवाडी कडे आला. दरम्यान हे तिघे बाजूस शेतात दबा धरुन बसले होते. या तिघांनी काही अंतर ट्रॅक्टर पुढे जावून दिला. पाठीमागून मोटारसायकल वरुन येवून ट्रॅक्टर अडवला. यातील शिंदे याने चाकूसारखे धारदार हत्यार चालक रजपूत याच्या गळ्याला लावले. त्यास तुझ्याजवळ काय असेल ते काढून दे,नाही तर मारीन, अशी धमकी दिली. त्याच्या खिशातील रोख ३००रुपये काढून घेतले. तर अन्य दोन साथीदारांनी रजपूत याचा मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, पाठीमागून दुसरा एक ट्रॅक्टर आल्याने दोघांनी मिळून या तिघांशी प्रतिकार केला. दरम्यान चव्हाण व गावडे हे पळून गेले. तर शिंदे हा त्यांच्या हाती लागला. या घटनेची माहिती परिसरातील अन्य लोकांना समजल्याने त्यांनीही धाव घेतली.त्यांनी कासेगाव पोलिसांना संपर्क साधून शिंदे याला त्यांच्या ताब्यात दिले. यापूर्वीही या परिसरात वाहन चालकांना अडवण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे या त्रिकुटाकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. तसेच यात आणखी काहींचा समावेश असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ करीत आहेत.

Related Stories

“कोरोनाची तिसरी लाट आल्यास त्याला भाजपच जबाबदार”

Sumit Tambekar

बंडातात्यासाठी आ.महेश शिंदे वारकरी वेशात रस्त्यावर

Patil_p

उक्कडगाव येथे वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या

Patil_p

CET परीक्षा हायकोर्टाने रद्द केल्याने, आता अकरावी प्रवेश प्रक्रिया होणार केंद्रीय पद्धतीने

Abhijeet Shinde

१४ ऑगस्ट आता ‘हा’ दिवस म्हणून ओळखला जाणार; पंतप्रधान मोदींनी केली घोषणा

Abhijeet Shinde

सांगलीतील रुग्णालयामध्ये आग सुरक्षा प्रतिबंधात्मक साधनांची सोय करण्याची मागणी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!