तरुण भारत

कोरोना आणि आपली समृद्धी

भारतात आजही साथीच्या रोगाच्या नियंत्रणासाठी 1897 ला अमलात आणलेला इंग्रजकालीन साथीरोग प्रतिबंध कायदा वापरला जातो. विशेष म्हणजे या कायद्यात साथी रोग म्हणजे काय याबद्दलची व्याख्या देखील नमूद करण्यात आलेली नाही, दुसऱया बाजूला त्याच इंग्रजांनी ‘कोरोना विषाणू आरोग्य संरक्षण कायदा 2020’ अस्तित्वात आणला आहे. एकंदरीत फरक काय तर ते काळानुसार बदलत गेले आणि आपण मात्र नव्या आव्हानांना सामोरे जाताना जुन्याच गोष्टी पुन्हा नव्याने अमलात आणत बसलो. अमेरिका, इटली, स्पेन, जर्मनी हे युरोपीय देश आपल्या तुलनेत लोकसंख्या कमी असतानादेखील एकून जीडीपीच्या 10 टक्के इतका खर्च आरोग्यसेवेवर करतात. असे असताना देखील हे देश आज हतबल होताना दिसत आहेत. आपला भविष्यमय अंधार इथूनच जाणवायला सुरुवात होते. आंतरराष्ट्रीय व्यापारीकरणातून संक्रमित झालेल्या साथीच्या आजाराची नोंद आजही कोलंबसचा इतिहास सांगतो. इ.स. 1492 मध्ये कोलंबस अमेरिकेच्या बेटावरती पोहचल्यावर  त्याबरोबर आलेल्या विषाणूमुळे अनेक लोक बाधीत झाले होते. आजही भारतात झालेला विषाणूचा प्रसार याचे कारणदेखील तत्वत: जागतिकीकरणच मानावे लागेल. आपला देश उद्योगधंद्यांच्या बाबतीत अनेक व्यवसायांच्या बाबतीत इतर देशांवर अवलंबून आहे आपण परस्परावलंबी बनलो आहोत. किंबहुना देशी वस्तूपेक्षा विदेशी वस्तू आपल्या भारतात जास्त विकल्या जातात हे जगजाहीर आहे. एखादी साथ जर जगभर पसरली तर त्याला पेंडेमिक असे म्हणतात. आतापर्यंत अशा जगभर पसरलेल्या अनेक साथींची उदाहरणे जगाला माहीत आहेत. बरं कोणतीही साथ त्या रोगाच्या विषाणूपासून पसरते. संसर्ग झाल्यानंतर विषाणू मानवाच्या शरीरात अर्थात पेशीत प्रवेश करतो. त्यानंतर विषाणू पेशीमध्ये आपली संख्या वाढवायला सुरुवात करतो. याचवेळी मानवी शरीर विषाणूच्या विरोधात अँटीबॉडीज तयार करायला लागते. या अँटीबॉडीज विषाणूवरती हल्ला चढवतात व नष्ट करतात. शरीर यातील काही अँटीबॉडीज राखून ठेवते व नंतर जर लागण झाली तर विषाणूस अटकाव करते. कोणत्याही विषाणूला नष्ट करण्यासाठी त्यावर जालीम उपाय म्हणून त्याच्या विरोधी लस वापरली जाते. एखाद्या विषाणूची लस म्हणजे त्या विषाणूचा विलग केलेला अंश असतो. जो आपण निरोगी माणसाला संसर्ग होऊ नये म्हणून टोचतो त्यानंतर आपले शरीर विषाणूच्या विरोधात अँटीबॉडीज तयार करायला लागते. मानवाने अशा अनेक आजारावर व विषाणूवर यशस्वी लस देखील उपलब्ध केली आहे. या सर्वांचे शिक्षण आम्ही विज्ञानाच्या पुस्तकात घेऊनसुद्धा सर्रास प्रतीजैविक व औषध उपाय म्हणून या काळात आपण वापरू लागलो हे सुशिक्षित दुर्दैव समजावे लागेल. साथीच्या रोगांचा प्रसार कित्येकदा झाला आहे. पण प्लेग, ईबोला, फ्लू पासून अलीकडे आलेल्या सार्स, मर्सपर्यंत या साथीच्या रोगांमध्ये सोशल मीडियाचा वापर फार कमी होता. पूर्वी आलेल्या साथीच्या रोगांच्या काळात त्या रोगाची माहिती समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोचायला उशीर लागायचा कारण तशी प्रभावी साधने उपलब्ध नव्हती. पर्यायाने लोक साथीच्या रोगांपासून व त्याच्या संक्रमणापासून अनभिज्ञ असायचे आणि यातूनच साथीचे रोग अधिक बळकट होत गेले. आज आपल्याकडे सोशल मीडिया हे प्रभावी साधन आहे. प्रसारमाध्यम म्हणून त्याचा वापर केल्यास क्षणार्धात माहिती सर्वत्र पोहचू शकते किंबहुना ती पोहचवलीदेखील आहे. पण तरीदेखील या विषाणूची सर्वत्र माहिती देऊन आपण त्याला आटोक्मयात आणण्यात असमर्थ बनलो आहोत हे मान्यच करावे लागेल. उलट याच सोशल मीडियामधून अनेक अफवांना बळ आले आणि त्या वाऱयासारख्या पसरल्या.

मध्यंतरी एका वृत्तवाहिनीने असे वार्तांकन केले की हायड्रोक्सिक्लोरोक्वीनची गोळी कोरोनावर उपाय म्हणून वापरात येत आहे. यावर लोकांनी लगेच स्वत:ला काहीही झालेले नसताना हायड्रोक्सिक्लोरोक्वीन घ्यायला सुरुवात केली. कारण काय तर ही गोळी खाल्ली की कोरोना होत नाही. हे प्रतीजैविक आहे म्हणजेच अँटिबायोटिक. कोणतेही प्रतीजैविक रोगाजंतूला अर्थात बॅक्टेरियाला मारण्यासाठी वापरला जातो. प्रतिजैविकाने विषाणू मारता येत नाही. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या म्हणण्यानुसार हे औषध प्रायोगिक पातळीवर कोरोनावर प्रतिबंधात्मक पातळीवर गुणकारी आहे. दी लॅन्सेट ग्लोबल हेल्थच्या अभ्यासानुसार हे औषध सार्स सीओव्ही 2 या विषाणूला मारण्याचे गुणधर्म दाखवते या औषधामुळे शरीरात एका विशिष्ट टप्प्यावर विषाणूंची संख्या जी अमर्यादितरीत्या वाढत जाते त्यावरती आळा घातला जाऊ शकतो. मेडिकल हेल्थच्या म्हणण्यानुसार या औषधांचे अनेक दुरुपयोगदेखील आहेत. मग त्यामध्ये डोकेदुखी, चक्कर येणे, अतिसार, उलटी, जठरावरती ताण तसेच उच्च रक्तदाब असणाऱया पेशंटना हे जास्त धोकादायक आहे. आपण आरोग्यदृष्टय़ा किती समृद्ध आहोत हे या काळातल्या बऱयाच उदाहरणावरून लक्षात येईल. साधारण शंभर वर्षांपूर्वी म्हणजेच 1918 साली फ्लूची साथ आली होती. यामध्ये जवळपास 1.5 ते 1.8 कोटी भारतीय नागरिक दगावल्याचा अंदाज त्यावेळच्या वृत्तपत्रांनी केला होता पण या सगळय़ाचे कारणही तसेच होते कारण त्यावेळी आपल्याकडे कोणत्याही प्रकारची प्रतिजैविके नव्हती व तितकी अद्ययावत आरोग्य व्यवस्थादेखील नव्हती. त्यावेळी देखील लोकांना घरीच राहण्याचे आदेश देण्यात आले होते. पण तरीदेखील लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळे हा आजार वाऱयासारखा पसरत गेला. आजदेखील सरकार आपल्याला घरातून बाहेर न पडण्याचे आदेश देत आहे आणि पूर्वीप्रमाणेच हादेखील आजार वाऱयासारखा पसरत चालला आहे. आज शंभर वर्षानंतर आपल्याकडे प्रतिजैविके आहेत. आरोग्यव्यवस्था आहे पण तरीदेखील या आजारावर आपण नियंत्रण मिळवू शकत नाही ही आपल्या आरोग्य व्यवस्थेची हतबलताच समजावी लागेल.

Advertisements

सद्यःस्थितीला यावर नियंत्रण मिळवण्यास विषाणूच्या संपर्कात न येणे हाच एक पर्याय आहे. उद्याच्या उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत असताना निसर्गाने मानवाला दिलेले धक्के व ते सावरण्याचे पर्याय यासहीत आपल्याला वाटचाल करावी लागेल. सुशिक्षित, समृद्ध, सजग विचारसरणीची मानवी चौकट आपल्याला उभी करावी लागेल. कोरोना कितीही भयंकर असला तरी सुसज्ज यंत्रणा व जागरूक नागरिक एकत्र आल्यास आपण हे युद्ध नक्कीच जिंकू शकू.

प्रा.स्वप्निल पाटील

Related Stories

कागदी मतपत्रिकेचा पर्याय!

Patil_p

ठामपणाचे कौशल्य अंगीकारणे गरजेचे

Patil_p

मुंबईतून आशेचा किरण

Patil_p

शशिकलांची शपथ घडवणार का उलथापालथ?

Amit Kulkarni

पुत्रे मित्रवदाचरेत्।…….सुवचने

Omkar B

साधुलक्षणे – सावधानता, गांभीर्य, धैर्य

Patil_p
error: Content is protected !!