तरुण भारत

गावी परतणाऱया कामगारांना मोफत प्रवास

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्यातील विविध भागातील कामगार आणि रोजंदारी कामगारांना आपापल्या गावी जाण्यासाठी परिवहन मंडळातर्फे व्यवस्था करण्यात आली आहे. या कामगारांच्या परिस्थितीचा विचार करून मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी पुढील तीन दिवस (मंगळवारपर्यंत) या कामगारांना बसमधून बिनातिकीट अर्थात मोफत गावी जाण्याची व्यवस्था केली आहे. यासाठी येणारा खर्च राज्य सरकारच परिवहन महामंडळाला (केएसआरटीसी) देणार आहे.

Advertisements

दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या मार्गसूचीनूसार राज्यात विविध भागात कामानिमित्त वास्तव्यास असणाऱया कामगारांना सरकारने बसेसची व्यवस्था केली होती. प्रवासाचा खर्च कामगारांनीच करावा, असे कळविण्यात आले होते. त्यामुळे गावी परतणाऱया कामगारांकडून दुप्पट वसूली केली जात होती. रोजच्या कमाईवर कुटुंबाचा चारितार्थ चालविणाऱया कामगारांना यामुळे नाईलाजाने हा खर्च करावा लागत होता. त्यामुळे सरकारने 1 मे रोजी विविध भागासाठी तिकीट दर निश्चित केले होत. मात्र. गावी परतणाऱया कामगारांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने मुख्यमंत्र्यांनी रविवारपासून तीन दिवस गावी परतणाऱया कामगारांकडून पैसे स्वीकारू नयते असा आदेश दिला आहे.

Related Stories

शेअरबाजारात सेन्सेक्स, निफ्टीची जोमाने वाटचाल

Patil_p

श्रीनगर चकमकीत दहशतवाद्याचा खात्मा

datta jadhav

लखिमपूर खेरीत सरकार-शेतकरी समझोता

Patil_p

हेमंत शर्मा यांच्याकडून वादग्रस्त टिप्पणी

Amit Kulkarni

माजी पोलिसासह ‘जैश’च्या चार दहशतवाद्यांना अटक

Patil_p

मोबाईल ऍप क्षेत्र.. प्रतिभावंतांची सुवर्णभूमी

Patil_p
error: Content is protected !!