तरुण भारत

ब्रिटीश शासनाच्या निर्णयावर क्रिकेटचे पुनरागमन अवलंबून

वृत्तसंस्था/ लंडन

कोरोना महामारीमुळे संपूर्ण ब्रिटनला चांगलाच धक्का बसला असून या महामारीचा प्रसार रोखण्यासाठी ब्रिटन शासनाकडून प्रयत्नांची शिकस्त केली जात आहे. दरम्यान ब्रिटनमधील सर्व क्रीडास्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. ब्रिटनमधील क्रिकेट हा क्रीडाप्रकार हा पूर्णपणे थांबविण्यात आला आहे. इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली आहे. दरम्यान ब्रिटीश शासनाच्या निर्णयावरच देशातील क्रिकेटचे पुनरागमन अवलंबून राहील, असे प्रतिपादन इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने केले आहे.

Advertisements

देशातील क्रिकेट हालचालीवर ब्रिटीश शासनाचे नियंत्रण असते. केवळ इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळावर याची जबाबदारी नसते. त्यामुळे इंग्लंडमधील क्रिकेटचे पुनरागमन लवकर होईल, अशी आशा ब्रॉडने येथील एका इंग्रजी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. कोरोना व्हायरसचा धोका पत्करण्याची मानसिक स्थिती ब्रिटनच्या खेळाडूंमध्ये दिसून येत नाही. बऱयाच खेळाडूंनी कोरोनाचा संभाव्य धोका पत्करण्यास नकार दिला आहे. ब्रिटनमधील कोरोना परिस्थितीमध्ये लवकरच सुधारणा होईल, अशी आशा ब्रॉडने व्यक्त केली आहे.

Related Stories

‘तो’ लोगो हटवण्याची मोईन अलीला परवानगी

Patil_p

क्रिकेटपटूंसाठी प्रशिक्षण शिबिराची घाई करणार नाही

Patil_p

भारतीय बुद्धिबळपटूला मेलबर्न विमानतळावर रोखले

Patil_p

हॉकी इंडियाकडून ओडिशा सरकारच्या सहायता निधीला 21 लाख

Patil_p

प्रज्नेश विजयी, रामकुमार, अंकिता पराभूत

Patil_p

मनोज तिवारीची नेमबाज होण्याची इच्छा

Patil_p
error: Content is protected !!