तरुण भारत

मार्टिनेझच्या करारात वाढ

वृत्तसंस्था/ ब्रुसलेस

बेल्जियमच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचे प्रमुख प्रशिक्षक रॉबर्टो मार्टिनेझ यांना त्यांच्या प्रशिक्षक कराराच्या कालावधीत वाढ देण्याचा निर्णय बेल्जियमच्या फुटबॉल फेडरेशनने घेतला आहे.

कतारमध्ये 2022 साली होणाऱया फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेपर्यंत मार्टिनेझ हे बेल्जियमच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून राहतील. 46 वर्षीय मार्टिनेझ यांच्याबरोबर तीन आठवडय़ापूर्वी बेल्जियम फुटबॉल फेडरेशनने करारात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. स्पेनचे मार्टिनेझ यांचा प्रमुख प्रशिक्षक पदाचा कालावधी चालू वर्षी होणाऱया युरेपियन चॅम्पियन्सशीप फुटबॉल स्पर्धेपर्यंत होता. आता कोरोना महामारीमुळे युरो चषक फुटबॉल स्पर्धा 2021 पर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. 2018 साली झालेल्या फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत बेल्जियमने तिसरे स्थान मिळविले होते. प्रशिक्षक मार्टिनेझ याला बेल्जियम फुटबॉल फेडरेशनकडून वार्षिक वेतन 1.33 दशलक्ष डॉलर्स दिले जाते. आता या वेतनात दुप्पट वाढ केली जाणार आहे.

Related Stories

एन्गिडीचे 6 बळी, ऑस्ट्रेलिया सर्वबाद 271

tarunbharat

मोहम्मद शमीची मजुरांना मदत

Patil_p

क्रोएशियाचा कोरिक दुसऱया फेरीत

Patil_p

गोलंदाजांनी साकारला न्यूझीलंडचा विजय

Omkar B

जोफ्रा आर्चरवर उद्या शस्त्रक्रिया

Patil_p

भारताचे सहा मुष्टियोद्धे अंतिम फेरीत

Patil_p
error: Content is protected !!