तरुण भारत

आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनची चुनी गोस्वामीना श्रद्धांजली

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार चुनी गोस्वामी यांचे गुरूवारी कोलकाता येथे वयाच्या 82 व्या वर्षी वृद्धापकालाने निधन झाले. भारतीय फुटबॉल क्षेत्रामध्ये गोस्वामी यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. आशियाई फुटबॉल कॉन्फडरेशनतर्फे चुनी गोस्वामी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Advertisements

एएफसीचे अध्यक्ष शेख सलमान बिन इब्राहीम अल खलिफा यांनी भारतीय फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना लेखीपत्र पाठविले असून या पत्रामध्ये एएफसीतर्फे गोस्वामी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली असल्याचे पटेल यांनी सांगितले. 1962 च्या आशियाई क्रीडास्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक मिळविणाऱया भारतीय फुटबॉल संघाचे नेतृत्व गोस्वामी यांनी केले होते. 1958 साली गोस्वामी यांनी फुटबॉल क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी 36 अधिकृत आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यापैकी 16 सामन्यांत त्यांनी कर्णधारपद भूषविताना 13 गोल नोंदविले होते. 1983 साली चुनी गोस्वामी यांना पद्मश्री पुरस्कार देऊन भारतीय शासनातर्फे गौरविण्यात आले होते. गोस्वामी यांनी बंगाल संघाला 1955, 1958 आणि 1959 साली संतोष करंडक फुटबॉल स्पर्धा जिंकून दिली होती. 1954 ते 1968 या पंधरा वर्षांच्या कालावधीत त्यांनी मोहन बागान संघाचे प्रतिनिधीत्व केले होते.

Related Stories

स्पेनचा फडशा पाडत इटली अंतिम फेरीत!

Patil_p

जडेजा सुपर किंग ! विराट सेनेचा विजयरथ रोखला !

triratna

मेस्सी बार्सिलोनाच्या सरावात दाखल

Patil_p

कॉम्प्टन, वॉनच्या विक्रमाशी रूटची बरोबरी

Patil_p

भारत-पाकिस्तान 24 ऑक्टोबरला आमनेसामने

Amit Kulkarni

मँचेस्टर युनायटेड उपांत्य फेरीत

Patil_p
error: Content is protected !!