तरुण भारत

कोरोनामुळे बांधकाम विभागाच्या मान्सूनपूर्व कामांना फटका

प्रतिनिधी/ सातारा

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून करण्यात येणारी कामे जिह्यात पावसाळ्यापूर्वी अजूनही राहिली आहेत.पावसाळा तोंडावर आला आहे.कोरोनामुळे काहीच हालचाल करता येत नाही.परंतु ही कामे करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी अटी शर्थी ठेवून या कामाकरता परवानगी दिली आहे.तसे आदेश बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना दिले आहेत.मात्र, अटी पाहून आणि कोरोनामुळे ठेकेदारही काम करण्यास पुढे येईना असे सध्या चित्र आहे.

Advertisements

 जिह्यात पावसाळ्याच्या पूर्वी अति तातडीच्या कामामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्र दुरुस्ती व बांधकाम, पशु वैधकिय दवाखाने बांधकाम व दुरुस्ती, प्राथमिक शाळा बांधकाम व दुरुस्ती, अंगणवाडी बांधकाम व दुरुस्ती, तातडीच्या रस्त्याच्या कामाची दुरुस्ती, साकव, लहान पूल, साठवण बंधारे दुरुस्ती कामे आदी कामे केली जातात. ही कामे उन्हाळ्यात सुरू असतात.मात्र, लॉक डाऊनमुळे काहीच निर्णय घेता येत नव्हते.परंतु नुकताच जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी एक आदेश काढला आहे.त्या आदेशानुसार जिह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असताना आगामी मान्सून कालावधीपूर्वी जिह्यातील शासकीय प्रकल्प व बांधकामाच्या अनुषंगाने अतितातडीची कामे तसेच आवश्यक दुरुस्ती व देखभाल इत्यादी कामांना काही अटी व शर्थीसह मान्यता देण्यात आली आहे.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्यांच्या विभागाकडील कामांना परवानगी देण्यासाठी प्राधिकृत केले आहे.त्या अनुषंगाने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी अतितातडीच्या कामांना परवाना देण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत.संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा संधारण अधिकारी, उपअभियंता बांधकाम व लघु पाटबंधारे यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.जिल्हा परिषदेचे उत्तर आणि दक्षिण बांधकामचे अभियंता, जिल्हा संधारण अधिकारी हे खाते प्रमुख असल्याने त्यांनी जी अतितातडीची कामे सुरू करायची आहेत त्याबाबत उपअभियंता यांच्याकडून प्रस्ताव घ्यावेत.लॉक डाऊन असल्याने शक्य असल्यास ऑफ लाईन घ्यावेत किंवा ऑनलाईन मेलद्वारे उपअभियंता यांच्या स्वाक्षरीने घ्यावेत.खाते प्रमुखांनी उपअभियंता यांच्या सहीची खात्री करावी, उपअभियंता यांनी आपल्या तालुक्यातील अतिमहत्त्वाची कामे व जी कामे मान्सून पूर्व करांवयाची गरजेची आहे.ती निश्चित करावीत.अशा कामाची यादी करून सर्व कामांचा प्रस्ताव आवश्यक कागदपत्रे तपासावी,अति तातडीच्या कामामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्र दुरुस्ती व बांधकाम, पशु वैधकिय दवाखाने बांधकाम व दुरुस्ती, प्राथमिक शाळा बांधकाम व दुरुस्ती, अंगणवाडी बांधकाम व दुरुस्ती, तातडीच्या रस्त्याच्या कामाची दुरुस्ती, साकव, लहान पूल, साठवण बंधारे दुरुस्ती कामे, आदी कामांचा समावेश करावा, उपअभियंता यांनी खात्री करावी, ठेकेदाराची नोंदणी, कामगारांची नोंदणी, वाहतूक यंत्र सामुग्री यांचे परवाने, कंत्राटदाराचे हमीपत्र, उपअभियंता यांचे प्रमाणपत्र आदी ची छाननी करणे गरजेचे आहे.कामास परवानगी दिल्यानंतर कामाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही कंत्राटदार व कामगार यांनी 5 किंव्हा 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येणार नाहीत याची दक्षता घेणे, बंधनकारक आहे.कामाच्या ठिकाणी सर्व सुरक्षित साधने, सॅनिटायझर, हँड ग्लोज मास्क यांचा वापर करणे, तसेच सोशल डिस्टनन्सचा पालन करणे बंधनकारक आहे.याचा भंग झाल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, उपअभियंता यांनी कामाच्या ठिकाणी वेळोवेळी भेटी देऊन तंतोतंत पालन केले जात आहे का याची पहाणी करावी, असे म्हटले असून हा आदेश अभियंता यशवंत लवटे,अभियंता एन.डी. भोसले, अभियंता बी.पी.शिवदास आणि उपअभियंता यांना काढला आहे.त्यामुळे ठेकेदाराने कामच नको आपलं गप्प बसलेल परवडले असा सूर जिह्यातील ठेकेदारांनी आळवला आहे.

Related Stories

‘किसान सन्मान’ मधिल ५० हजार शेतकरी वंचित

Abhijeet Shinde

महाराष्ट्राला औषधांचा पुरवठा केल्यास तात्काळ कारवाई करु; मंत्री नवाब मलिक यांचा दावा

Rohan_P

राजू शेट्टी दूध संघवाल्यांचे पंटर रघुनाथदादा पाटील यांची टीका

Abhijeet Shinde

रत्नागिरी जिल्ह्यात ‘तौक्ते चक्रीवादळ’ दाखल

Abhijeet Shinde

कळंबा कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांची तडकाफडकी बदली

Abhijeet Shinde

कोरोना रुग्ण उपचार नाकारण्याचा जगदाळे मामा हॉस्पिटल कडून गंभीर प्रकार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!