तरुण भारत

जिओमध्ये अमेरिकन कंपनी ‘सिल्वर लेक’ची 5,656 कोटींची गुंतवणूक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

रिलायन्स कंपनीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी आज अजून एका कराराची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, हा करार जिओ प्लॅटफॉर्म आणि अमेरिकन कंपनी ‘सिल्वर लेक’ यांच्यामध्ये झाला आहे. 

Advertisements


सिल्वर लेक कंपनीने केवळ एक टक्का हिस्सेदारी करीता जिओ मध्ये 5,656 कोटींची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीमुळे जिओ प्लॅटफॉर्म ची इक्विटी व्हॅल्यू 4.90 लाख कोटी रुपये तर एंटरप्राइज व्हॅल्यू 5.15 लाख कोटी झाली असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. 


याबाबत बोलताना रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सांगितले की, सिल्वर लेक फर्मचे जगभरातील दिग्गज टेक्नॉलॉजी क्षेत्रातील कंपन्यांबरोबर पार्टनरशिप चे रेकॉर्ड आहे. तसेच टेक्नॉलॉजी आणि फायनान्सच्या बाबतीत सिल्वर लेक कंपनी लोकप्रिय आहे. 


याआधी सिल्वर लेकने एअरबीएनबी, डेल टेक्नॉलॉजी, अल्फाबेट व्हेरीली, अलीबाबा ग्रुप, ट्विटर सारख्या आधी कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. सिल्वर लेकच्या व्यवस्थापनाखाली जवळजवळ 40 अरब डॉलरची एकत्रित मालमत्ता आहे. 


याआधी फेसबुकने देखील रिलायन्स जिओ बरोबर तब्बल 5.7  बिलियन डॉलर्स ची म्हणजेच 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. 

Related Stories

लवादांमधील नियुक्त्यांकरता 2 आठवडय़ांची मुदत

Patil_p

‘व्हॉट्सऍप’कडून डार्क मोड सुविधा सादर

tarunbharat

ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत मुलासह मुकुल रॉय यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

triratna

जिओची ‘क्रिकी’मध्ये गुंतवणूक

Patil_p

सलग दुसऱया दिवशीही कोरोना रुग्णसंख्येत वाढ

Amit Kulkarni

उत्तर प्रदेश : कन्नोज जिल्ह्यात झालेल्या अपघातात 3 जण जागीच ठार

Rohan_P
error: Content is protected !!