तरुण भारत

गोवा आरोग्य सेवेचे सशस्त्रदलाकडून अभिनंदन

नौदलाच्या हॅलीपॅप्टने केली पुष्पवृष्टी

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

गोवा आरोग्य सेवेने कोरोना व्हायरस विरोधात यशस्वी लढा दिल्याबद्दल सशस्त्र wदलाकडून गोवा आरोग्य सेवेचे अभिनंदन केले आहे. काल रविवारी नौदलाच्या हेलिपॅप्टरने बांबोळी येथील गोमेकॉ व मडगाव येथील हॉस्पिसीओ इस्पितळावर पुष्पवृष्टी करून बॅण्ड वाजवून आरोग्य सेवेत काम करणाऱया सर्व कर्मचाऱयांचे अभिनंदन केले. सशस्त्र दलाने केलेले अभिनंदन हे आरोग्य सेवेतील कर्मचाऱय़ांना प्रोत्साहीत करणारे ठरेल असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

युध्द काय असते त्याची जाणीव सशस्त्र दलाला चांगलीच आहे. त्यामुळेच सशस्त्रदलाने आमच्या कार्याची दखल घेतली आहे. कोरोना व्हायरस हे एक महासंकट असून गेले कित्येक दिवस गोव्यातील आरोग्य सेवा या महासंकटा विरोधात एक प्रकारचे युध्द लढत होते. आत्तापर्यंत आम्हाला चांगले यश मिळाले असून पुढील काळातही आम्हाला जागृत रहाणे काळाची गरज आहे असेही आरोग्यमंत्री राणे म्हणाले. नौदलाने पुष्पवृष्टी केली तेव्हा अरोग्यमंत्री राणे हे गोमेकॉच्या कर्मचाऱयासोबत गोमेकॉच्या बाहेरच उभे होते. गोवा आरोग्य सेवेच्या कर्मचाऱयांच्या कामाची पंतप्रधान मोदी यांनी दखल घेतल्याबद्दल राणे यांनी पंतप्रधान मोदी यांचेही आभार मानले.

गोव्यात आढळलेल्या सातही रुग्णांना ठिक करण्यात गोवा आरोग्य सेवेत काम करणाऱया कर्मचाऱयांशी यश संपादन केले आहे. तसेच 3 एप्रिल ते 3 मे पर्यत राज्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळलेला नाही हे आमचे खरे यश आहे. कोरोना विरोधात लढा देण्यासाठी गोव्यातील प्रत्येक नागरीकांने खारीचा वाट उचललेला आहे. राज्यात लॉकडाऊनचा तीसरा टप्पा सुरु झाला असून आताही लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन राणे यांनी केले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही राज्यातील आरोग्य खात्याचे अभिनंदन केले आहे, तसेच सशस्त्र दलाचे धन्यवाद व्यक्त केले आहेत.

Related Stories

परतीच्या पावसाने जनजीवन विस्कळीत

Patil_p

चार महिन्यानंतर पिसुर्ले सत्तरी नवदुर्गा देवीचे दर्शन भाविकांसाठी खुले

Patil_p

प्रत्येक नगरपालिकेत भाजपची सत्ता असेल : सदानंद शेट तनावडे

Patil_p

राज्यात ‘लॉकडाऊन’चे आशादायी परिणाम

tarunbharat

घन कचरा व्यवस्थापनासाठी फोंडा शहरात अभिनव प्रयोग

Amit Kulkarni

काँग्रेसची 33 टक्के उमेदवारी युवकांना

Patil_p
error: Content is protected !!