तरुण भारत

हातकणंगले येथे सतराशे परप्रांतीयांचे गावी जाण्यासाठी नोंद

प्रतिनिधी / हातकणंगले

लॉक डाऊन नंतर शासनाने परप्रांतीय तसेच अडकून राहिलेल्या नागरिकांना आपापल्या गावी जाण्यासाठी नोंदणी करण्यास सांगितल्याप्रमाणे हातकणंगले नगरपंचायत मध्ये सतराशे परप्रांतीय कामगारांची नोंद झाली असून, लवकरच त्यांना त्यांच्या राज्यांमध्ये जाण्यास परवानगी देण्यात येणार आहे. नोंदणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात परप्रांतीय नागरिकांनी नगरपंचायती मध्ये गर्दी केली होती. एकीकडे नागरिक आपापल्या गावी जाण्यासाठी आनंदी झाल्या आहेत. तर उद्योजक हवालदिल झाल्याचे चित्र हातकलंगले औद्योगिक वसाहतीमध्ये पहावयास मिळत आहे.

Advertisements

सोशल डिस्टन्स ठेवून कारखाने चालू करण्याची मुभा जरी दिली असली, तरी हातकणंगले परिसरामधील औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात कापड उद्योग फौंड्री उद्योगात असल्यामुळे या ठिकाणी सोशल डीस्टन्स चे नियम पाळणे कठीण जाते. त्यामुळे अनेक उद्योजकांनी कारखाने बंद ठेवले आहेत. तर कामगारांना ऍडव्हान्स पोटी मोठ्या रकमा दिल्याने आता हे कामगार रीतसर आपल्या गावी चालल्याने कारखानदार आपल्या ऍडव्हान्स पोटीच्या रक्कमेचे काय या साठी हवालदिल झाले आहेत. ते कामगार परत येतील की नाही याची उद्योजकांना शाश्वती नाही तर कामगार आपापल्या गावी जाण्यात ठाम असल्याने उद्योजकांची चांगलीच कोंडी झाली आहे.

Related Stories

कोल्हापुरात आज पुन्हा ९ रुग्ण वाढले, संख्या २३७ वर

triratna

राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक ;शरद पवार कार्यालयात पोहोचले

triratna

मकरसंक्रांतीनिमित्त बाजारपेठेत गर्दी

Patil_p

शिरोळ पंचायत समितीच्या सभापतींनी शिपाई आंबींना दिला ध्वजारोहणाचा मान

triratna

कोरोना सातारा शहराचा फास आवळू लागला

Patil_p

हृदयविकाराच्या धक्क्याने वृद्धाचा रस्त्यावरच मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!