तरुण भारत

पाकिस्तान एअर फोर्समध्ये पहिल्यांदाच हिंदू पायलट दाखल

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 

पाकिस्तान एअर फोर्समध्ये पहिल्यांदाच हिंदू पायलट दाखल झाला आहे. पाकिस्तानच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. 

Advertisements

राहुल देव असे या हिंदू पायलटचे नाव असून, पाकिस्तान एअर फोर्समध्ये जनरल ड्युटी पालयट ऑफिसर म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  राहुल देव हे पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील थारपारकर जिल्ह्यातील आहेत. आजपर्यंत पाकिस्तानच्या एअर फोर्समध्ये कोणीही हिंदू पायलट दाखल झाला नव्हता. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच राहुल हा हिंदू पायलट म्हणून एअर फोर्समध्ये दाखल झाला आहे. पाकिस्तानी एअर फोर्सने याबाबतचे ट्विट केले आहे.

ऑल पाकिस्तान हिंदू पंचायत सेक्रेटरी रवि दवानी यांनी राहुल देवचे अभिनंदन केले आहे. त्यावेळी दवाने म्हणाले, अल्पसंख्याक समाजातील अनेक तरुण यापूर्वीच नागरी आणि सैन्य अधिकारी म्हणून देशाचा दर्जा वाढवत आहेत. एअर फोर्समध्येही आता अल्पसंख्याक समाजातील तरुणाची एन्ट्री झाल्याने पाकिस्थांसाठी ही अभिमानाची बाब आहे.

Related Stories

चीनसाठी हेरगिरी, ब्रिटनच्या 200 प्राध्यापकांवर संशय

Patil_p

लॉकडाऊनमध्ये आरोग्य सुविधा वाढवण्याऐवजी दिवे पेटवत राहिलो; अर्थमंत्र्यांच्या पतीकडूनच मोदी सरकारवर टीका

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 32 हजार 75 वर

Rohan_P

महाराष्ट्र : कोरोना रुग्णांचा आकडा 19 लाख 61 हजार 975 वर

Rohan_P

नागपूरमध्ये उद्या आणि परवा ‘जनता कर्फ्यू’

Rohan_P

शिकागो महापालिकेत भारताची भूमिका वरचढ

Amit Kulkarni
error: Content is protected !!