तरुण भारत

उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने घेतला पुणे विभागाचा आढावा

ऑनलाईन टीम / पुणे :  

कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीने सर्वेक्षण, कंटेन्मेन्ट झोनमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व आवश्यकतेप्रमाणे क्वारंटाईन करण्यावर भर द्यावा, तसेच प्रतिबंधात्मक आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना उच्चस्तरीय केंद्रीय पथकाचे प्रमुख डॉ. ए. के. गडपाले यांनी आज विभागीय आयुक्तांना केल्या.

Advertisements

विभागीय आयुक्त  कार्यालयात आरोग्य सेवेचे अतिरिक्त सल्लागार डॉ. ए. के. गडपाले यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 ची वाढती संख्या, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना यासाठी भविष्यात करावयाचे नियोजन याची आढावा बैठक झाली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, मायक्रोबायोलॉजी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे संचालक डॉ. व्ही. एस. रंधावा, अनेस्थेशिया आणि गहन काळजी युनिटचे डॉ. अंशु गुप्ता, कम्युनिटी मेडिसीन एबीव्हीआयएमएस आणि आरएमएल हॉस्पिटलचे सहायक प्रा. डॉ. सागर बोरकर आदी उपस्थित होते.  

डॉ. गडपाले म्हणाले, पुणे शहरातील महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगर पालिका हद्दीतील झोपडपट्टीच्या अथवा जास्त घरांची गर्दी असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करावे. सार्वजनिक स्वच्छतागृह आहे तेथे अधिक काळजी घेणे आवश्यक आहे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. या केंद्रीय पथकाने आज पुणे विभागातील पुणे शहराबरोबरच सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात वाढत जाणाऱ्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांचाही आढावा घेतला.

Related Stories

पुणे विभागातील 1 लाख 45 हजार 719 रुग्ण कोरोनामुक्त 

Rohan_P

”दिल्लीची हुजरेगिरी करून महाराष्ट्राची बदनामी करणारे हे मंत्री काय कामाचे?”

Abhijeet Shinde

सोलापूर : नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून सुमारे ७९ लाख दंड वसूल

Abhijeet Shinde

“कारणं सांगू नका, माझ्या गतीने कामं करा”

Abhijeet Shinde

पंकजा मुंडेंची चंद्रकांत पाटलांनी घेतली भेट, म्हणाले…

Abhijeet Shinde

SSPMS येथील छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ स्मारकासमोर उभारणार राजदंड स्वराज्यगुढी

Rohan_P
error: Content is protected !!