तरुण भारत

कौटुंबिक हिंसाचाराचा व्हायरस

कोरोना व्हायरसने जगात अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. लॉकडाऊन झाल्यामुळे माणसे घरातच कोंडली गेली. या कोंडलेल्या जगात माणसाच्या भावनाही कोंडल्या गेल्या. त्यातून अगणित कौटुंबिक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यातील प्रमुख समस्या म्हणजे कौटुंबिक हिंसाचार. कोरोना व्हायरसच्या या काळात कौटुंबिक हिंसाचाराचा हा व्हायरस देशभरात एवढा  पसरला आहे, की अनेक महिलांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. पुरुषपणाच्या महिलांवरील वर्चस्वाचा हा व्हायरस आताच पसरला आहे, असे मात्र म्हणता येणार नाही. म्हणूनच कोरोनाचा व्हायरस आज ना उद्या संपणारच आहे पण कौटुंबिक हिंसाचाराचा व्हायरस मुळापासून संपवायचा असेल, तर त्याच्या मुळाशीच जावे लागले. यासाठी आधी समाजाची मानसिकता बदलण्यासाठी सातत्याने उपायोजना करावी लागेल. भारत हा सर्व धर्मांचा समावेश असलेला देश आहे. इथे कधीच स्त्राr-पुरुष समानता नव्हती. आपण हे राज्य पुरोगामी, ते राज्य पुरागामी म्हणत आलो कारण पुरोगामी विचारांचे महामानव इथे जन्माला आले. त्यांनी स्त्रियांचा सन्मान कायम राखला, हे खरे आहे. त्यांनी कायमच स्त्राrला सन्मानाने वागवले. पण त्याकाळीही एकूण समाज स्त्राrला दुय्यम मानत होता, त्याच्या आधीही मानत होता आणि आताच्याही काळात तिला दुय्यम मानत आहे, म्हणूनच तर लॉकडाऊनच्या काळात स्त्रियांवर कुटुंबात अन्याय होण्याच्या प्रकारात वाढ होत असल्याच्या तक्रारी ही वस्तुस्थिती नजरेआड करून चालणार नाही. स्त्रियांनी आज सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. तरी कुटुंबात मात्र पुरुषसत्ताक प्रवृत्तीतून सर्व स्तरातील स्त्रियांवर अन्याय होत असल्याचे दिसून येत आहे. यातूनच स्त्राr ही गृहिणी असेल, तर तिला अधिक दुय्यम स्थान मिळत असते. ते जसे घरात मिळते, तसे ते तिला समाजातही मिळत असते. यातूनच गृहिणीला सामाजिक बंधनाला सामोरे जावे लागते. तिला नोकरी करणाऱया स्त्राrपेक्षा अधिक सामाजिक बंधने पाळावी लागतात. खरे तर ती बंधने तिच्यावर लादली गेलेली असतात. गृहिणीने कोणते कपडे घालावेत, कोणत्या ठिकाणी जावे, कोणाशी कसे बालावे आणि विशेषत: आपल्या आवडी-निवडी काय जपाव्यात हे सर्वस्वी तिच्या घरच्या वातावरणावरच अवलंबून असते. याउलट तिच्या घरची एखाद-दुसरी स्त्राr ही नोकरी करत असेल, तर तिला हे नियम लागू नाहीत. कारण तिला कायमच बाहेर जावे लागते, ती घरची कमावती असते. मात्र, गृहिणी म्हणून घरात वावरणाऱया स्त्राrलाही काही आवडी-निवडी आहेत, हे अनेकांच्या गावीही नसते. बऱयाचवेळा अशी स्त्राr अधिक कलासक्त असण्याची शक्यता असते. पण तिच्या कला जीवनाकडे दुर्लक्षच केले जाते. उलट एखाद्या कलेबाबत तिने मत क्यक्त केले, तर ‘हिला काय कळते’ अशा नजरेने तिच्याकडे पाहिले जाते आणि तिला मध्येच थांबवत विषयही बदलला जातो. परिणामी तिच्या एकूण जगण्याच्या आत्मविश्वासावर परिणाम होत असतो. अशा स्त्राrला घरातल्या कोणत्याही निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान नसते. किंबहुना निर्णय प्रक्रियेत तिला घेतलेही जात नाही. तर दुसरीकडे तिची सतत घरातच अवहेलना केली जाते. त्यामुळे तिच्या मुलांचाही तिच्याकडे बघण्याचा तसाच दृष्टिकोण बनत असल्याने, पर्यायाने एकूण स्त्राrकडेच बघण्याचा दृष्टिकोण मुलांचा तसाच बनतो. हा धोकाही कोण लक्षात घेत नाही. स्त्राrला समाजाने देवीचे रूप दिले आहे आणि अनंत काळाची माताही संबोधले आहे. पण या दोन सर्वाधिक पवित्र उपमा देऊनही गृहिणीला ‘सेवेकरीच’ म्हणून वागणूक दिली जाते हे दुर्दैवी आहे. आज आपण जागतिकीकरणाचे गोडवे गात आहोत. जागतिकीकरणातून जग जवळ आले, त्याला आता सुमारे तीस वर्षे होत आली आहेत. इंटरनेट किंवा इतर  समाज माध्यमातूनही स्त्राrच्या व्यक्ती स्वातंत्र्याबाबत प्रबोधन होत आहे. पण गृहिणीला दुय्यम स्थान दिले जाते, त्याबाबतचा उद्गार यात कुठे आहे. त्यामुळे आताच्या या लॉकडाऊनच्या काळात कौटुंबिक अत्याचार होणाऱया स्त्रिया या विविध क्षेत्रात काम करणाऱया असल्याचे पुढे आले असले, तरी त्यांनी आपल्या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न चालविला आहे. पण संसार करणारी स्त्राr मात्र या काळात आपल्यावर होणारा कौटुंबिक अत्याचार मूग गिळून सहन करत असल्याचेही वास्तव आहे. लॉकडाऊनच्या काळात कुटुंबातील मनोरंजनाचे अनेक प्रसंग सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत. पण त्यापलीकडचे वास्तव कुटुंबात असते. त्याचा आपल्याला शोध घ्यावासा वाटत नाही. कारण हे जगच असे आहे, की जे समोर येते, त्यालाच आपण सत्य मानायला लागलो आहेत. पण जे आपल्या समोर येते, ते पुनः पुन्हा तपासून घ्यावे लागतेच. ‘द वीक’च्या एका वृत्तानुसार लॉकडाऊनच्या काळात कौटुंबिक हिंसाचाराविरोधात काम करणाऱया हेल्पलाईनवर 92 हजारपेक्षा जास्त फोन कॉल्स आल्याची नोंद आहे. यावरून लॉकडाऊनच्या काळात कौटुंबिक अत्याचारात किती वाढ झाली, याची आपल्याला कल्पना येऊ शकते. कोविड 19 मध्ये महिलांवर कौटुंबिक हिंसाचारात फक्त भारतातच वाढ झाली, असे मात्र नाही. तर प्रत्येक देशात ही अत्याचाराची मालिका वाढती असून युरोप, चीनमधे यात जास्त वाढ आहे. जगभरात महिलांसाठी काम करणाऱया सगळय़ा एनजीओंनी त्यांच्या-त्यांच्या सर्वेक्षणातून हे दाखवून दिले आहे. तर त्या-त्या देशाच्या सरकारांनीही हे स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या काळात माणूस अधिक माणसात येईल, असे वाटले होते. पण तसे काही झाले नाही हे या अत्याचारावरूनच लक्षात येत आहे. याचे कारण आपला समाज मातृसत्ताक नाही, तर पितृसत्ताक आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे. ही पितृसत्ताक परंपरा आपल्यात एवढी मुरली आहे की बाई आपल्या विरोधात साधा एक शब्द बोलली, तरी आपण तिच्यावर हात उगारायलाही मागे-पुढे पाहत नाही. त्यामुळेच बाईवर अत्याचार होत जाणारा व्हायरल विषाणू आजवर जास्तीत जास्त पसरत गेला आहे. असा अन्याय करणाऱयांनाच आधी क्वारंटाईन करण्याची गरज आहे. कोरोनासारख्या महामारीचा साथीचा रोग असो, युद्ध असो किंवा जातीय, धार्मिक दंगली असोत, यात सर्वाधिक भरडली जाते ती बाईच आणि याच काळात बाईच अधिक संवेदनशील असते. समजा एखाद्या भागात धार्मिक दंगल झाली, तर त्यावेळी दोन धर्मांतील पुरुष बोलताना असे म्हणतात, की दंगलीत मुस्लिम मारला गेला, हिंदू मारला गेला. मात्र, कुठल्याही धर्मातील बाई म्हणते, ‘आदमी मारला गेला, माणूस मारला गेला.’ तरीही अशा काळात बाईवरच अन्याय होत असतो. अगदी याबाबत 2002 ची गुजरात दंगल असो, वा त्या आधीची मुंबई दंगल यांची उदाहरणे घेतली, तरी या दंगलींमध्ये महिलांवर बलात्कार, अत्याचार होत राहिले. पण या नंतर महिलांना न्याय मिळाला, अशी कमीच उदाहरणे आहेत. यासाठी घरातूनच बदलाची सुरुवात करण्याची गरज असून असे झाले, तरच आपण पितृसत्तेचा व्हायरस नष्ट करू शकतो!

Related Stories

सकाम कर्मे माणसाचा घात करतात

Patil_p

कोरोनामुळे जगाला व भारताला धडा

Patil_p

उच्च शिक्षण सुधारणा अहवालांची फलश्रुती कुठवर (?)

Patil_p

तूच सूर ठावा मजसी…

Patil_p

मोदी सरकारला सुप्रीम दणका

Patil_p

गोवा कोरोनामुक्त झाल्याची घोषणा घाईची

Patil_p
error: Content is protected !!